Weight Loss: वजन कमी करण्याच्या नादात तुम्हीही 'या' चुका करता का?

आताच थांबवा नाहीतर...
weight loss
weight losssakal

सध्या बदलत्या जीवनमानामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यात वजन वाढीचं प्रमाण अधिक आहे. वजन कमी करण्यासाठी आपण वाट्टेल ते प्रयत्न करतो पण अनेकदा वजन कमी होत नाही. पण खरंच तुम्ही वजन कमी करण्यासाठी योग्य मार्ग निवडत आहात का? तुम्हीही वजन कमी करण्यासाठी चुका तर करत नाही? चला या विषयी सविस्तर जाणून घेऊया.

weight loss
Weight Gain: झपाट्याने वजन वाढतंय? हे असू शकतं कारण

जर तुमचे वजन जास्त आहे आणि तुम्ही वेट लॉस करायचा विचार करत असाल तर चांगल्या न्यूट्रिशनिस्टला भेटा आणि त्यांंनी सांगितलेली डाईट फॉलो करा. लक्षात ठेवा की स्वत: च्या डाइटचा प्लान स्वत: बनवू नका किंवा इंटरनेटवर पाहून वजन कमी करण्याचा प्रयत्न करू नका.

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक दिवशी डाइटचा प्लान करणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला माहिती होतं की तुम्ही रोज किती जेवण करता. आतापर्यंत किती कॅलरी घ्यायचे आणि शरिराला किती कॅलरी घेण्याची गरज आहे. अनेक जण डाइट फॉलो करत नाही.

वजन कमी करण्यासाठी कधीच प्रोटीन घेणे सोडू नये. जेवणपण अचानक सोडू नये. असे केल्याने ब्लड शुगर लेवल कमी होतं आणि तणाव वाढतो. वजन कमी करताना एक्सरसाइज अचानक सुरू करू नका. दररोज थोड्या थोड्या एक्सरसाइज करा.

वजन कमी करण्यासाठी चुकीचं फूड कॉम्बिनेशन घेऊ नका. जेवणात 50 टक्के भाज्यांचा समावेश करा ज्यामध्ये सलाद असायला हवा. 25 टक्के प्रोटीन, 25 टक्के कार्बोहाइड्रेट घ्या. आहारात ताक किंवा दहीचा सुद्धा समावेश करा.

weight loss
Weight Loss: तुळशीच्या पानांनी कमी होतं वजन, कसं जाणून घ्या

बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेक आजार होतात आणि अनेक आजारांमुळे वजन वाढायला सुरवात होते. अशावेळी डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सोबतच जर तुम्ही योग्य डाइट प्लान फॉलो करता तर तुम्ही वजन कमी करू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com