Camphor: पाच रुपयांचा कापूर झटक्यात करेल तुमचा सर्दी खोकला दूर | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Camphor

Camphor: पाच रुपयांचा कापूर झटक्यात करेल तुमचा सर्दी खोकला दूर

देवघरात वापरला जाणारा किंवा धार्मिक कामात वापरला जाणाऱ्या कापूरचे तितकेच आरोग्यदायी फायदे सुद्धा आहे. सुरवातीला कापूर हा सिनमोरम कंफोराच्या झाडाच्या साली आणि लाकडा पासून बनवला जायचा मात्र आज काल कापूर बनविण्यासाठी टर्पेन्टाइन तेलाचा वापर होतो. ( Healthy Lifestyle Update)

अगदी कमी पैशात मिळणाऱ्या कापूरचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत. (Five rupees camphor help you to stay away from cough and cold)

हेही वाचा: Healthy Lifestyle: ब्रेकफास्टमध्ये करा 'हे' पाच बदल; पोट दिसेल एकदम फ्लॅट

कापूरचे फायदे :

  • कापूर वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

  • त्वचेवर होणारे रॅशेससुद्धा कापूरमुळे कमी होतात.

  • याशिवाय त्वचारोगापासून सुटका मिळवण्यासाठी कापूरचा फायदा होतो.

हेही वाचा: Health: दररोज खा एक-दोन लवंग; होतील ‘हे’ फायदे!

  • विशेष म्हणजे वारंवार होणारा सर्दी आणि खोकला ठीक करण्यासाठीही कापूर हे खूप फायदेशीर आहे

  • केसाची वाढ असो किंवा केस गळती यासाठीही कापूर महत्त्वपूर्ण आहे

  • डोक्यामधील उवा कमी करण्यासाठी कापराचा घरगुती उपाय करतात.

  • आयुर्वेदीय औषधांमध्ये वापरला जाणारा कापूरला भीमसेनी कापूर म्हणून ओळखतात. यातील अनेक औषधी गुणधर्म अनेक आजार पळवतात.

  • याशिवाय घरात कापूर जाळल्याने डास सुद्धा पळतात.