Weight Gain: झपाट्याने वजन वाढतंय? हे असू शकतं कारण

झपाट्याने वजन वाढण्यामागे काय नेमकं कारण आहे? जाणून घ्या
Weight Gain
Weight Gainsakal

सध्या वजन वाढीच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बदलते जीवनमान यामुळे वजन वाढतंय. हल्ली झपाट्याने वजन वाढतंय. असं झपाट्याने वजन वाढण्यामागे काय नेमकं कारण आहे, याचा आपण कधी विचारही करत नाही. पण जर आपल्याला यामागील कारणे माहिती झाली तर आपण वजन वाढीला आळा बसवू शकतो. चला तर या मागील कारणे जाणून घेऊया. (healthy lifestyle know the reason behing fast or rapid weight gain)

अपूर्ण झोप -

डॉक्टरांच्या मते आपण ७-८ आठ झोप घ्यायला हवी. अनेकदा आपण रात्री उशीरा झोपतो आणि सकाळी कामाच्या धावपळीत लवकर उठावं लागतं. यामुळे झोप अपूर्ण होते ज्याचा थेट परिणाम झोपेवर होतो.

तणाव -

कधी कधी कामाचा ताण हा तणाव निर्माण करतो. याचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर होतो आणि आपलं वजन वाढायला सुरवात होते. त्यामुळे नेहमी पॉजिटिव्ह राहणे गरजेचे आहे. ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस येणार नाही.

शरीराल पूरक पाणी न पिणे -

शरीराला पाण्याची खूप आवश्यक असते. जर शरीराला मुबलक पाणी मिळाले नाही तर सहज वजन वाढतं. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे.

जंक फूड खाणे -

खाण्याची सवय माणसाच्या शरीरावर खोलवर परिणाम करत असते. जर तुम्हाला जंक फूड खाण्याची सवय असेल तर आताच थांबवा नाहीतर तुमचे वजन झपाट्याने वाढेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com