हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन होण्याच्या प्रमाणांत वाढ होताना दिसत आहे. आपल्या ओळखीत अशा घटना नक्की घडलेल्या असतात. अगदी तरुण वयातील मुलं-मुलीही हृदयविकाराच्या झटक्याने दगावल्याची प्रकरणं आपल्याला माहीत असतील. पण हे प्रमाण आता का वाढत आहे?
हे बदलत्या जीवनशैलीमुळे ओघानेच आलेले आजार आहेत का? बदलती जीवनशैली म्हणजे नक्की काय? याचे आपल्या जीवनावर आणि प्रकृतीवर कुठले परिणाम होतात आणि त्यावर आपण कोणता तोडगा काढू शकतो?