Eating too much sugar can silently harm your heart, liver, brain, teeth, and overall health.
sakal
Shocking Effects of High Sugar Intake on Your Body: आपल्या रोजच्या दैनंदिनीत दिवसातून बऱ्याचवेळा आपण या ना त्या कारणाने साखर खातच असतो. सकाळ- संध्याकाळचा चहा किंवा कॉफी, बिस्किट्स, जेवणानंतरचं गोड तर बहुतेक जण न चुकता खातात. कधी कधी कोल्ड ड्रिंक्स असतील, ब्रेड असेल; असं बरंच काही आपण नकळत साखरेसह खातो.
अधूनमधून गोड खाणं ठीक असलं, तरीही प्रक्रिया केलेल्या साखरेचं (Processed Sugar) सेवन शरीरावर गंभीर परिणाम करू शकते. मुख्य म्हणेज जास्त प्रमाणात साखर खाल्ली तर आपल्या शरीरातल्या अनेक अवयवांवर (Body Organs) विपरीत परिणाम दिसून येतात. त्यामुळे प्रमाणात साखर खाणे गरजेचे आहे.