Lower Blood Pressure: Why Boosting Potassium is as Vital as Reducing Salt
esakal
How to lower blood pressure with potassium: उच्च रक्तदाब (Hypertension) नियंत्रित ठेवण्यासाठी आतापर्यंत फक्त आहारातील मिठाचे (सोडियम) प्रमाण कमी करण्याचा सल्ला दिला जात होता. पण, नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनाने या पारंपारिक कल्पनेला छेद दिला आहे. केवळ मीठ कमी करून भागणार नसून, आहारात पोटॅशियमचे (Potassium) प्रमाण वाढवणे उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे 'द अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन'मध्ये प्रकाशित अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते, शरीरातील सोडियम आणि पोटॅशियमचे गुणोत्तर (Ratio) हे हृदयाच्या आरोग्याचा सर्वात अचूक निर्देशांक आहे.