
High Triglycerides
Sakal
देशातील पाच ते नऊ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ट्रायग्लिसराइड्सची पातळी वाढल्याने हृदयरोगाचा धोका वाढला आहे. जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत हे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण १९.१ टक्के असून केरळमध्ये सर्वात कमी आहे. 'चिल्ड्रन इन इंडिया २०२५' अहवालाने या बाबींचा उलगडा केला आहे.
High triglycerides in children aged 5-9 heart disease risk: देशातील पाच ते नऊ वर्षे वयोगटातील एकतृतीयांश मुलांमध्ये ‘ट्रायग्लिसराइड्स’ची पातळी जास्त असल्याची शक्यता असून, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांत हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सरकारी अहवालातून समोर आले आहे.
‘ट्रायग्लिसराइड्स’ ही रक्तात आढळणारी चरबी असून यामुळे भविष्यात हृदयरोगाचा धोका वाढवते, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेले आहे. ‘चिल्ड्रन इन इंडिया २०२५’ हा २००८ नंतरचा चौथा अहवाल हा सांख्यिकी व उपक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने २५ सप्टेंबर रोजी चंडीगड येथे झालेल्या ‘सेंट्रल अँड स्टेट स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन्स’च्या २९व्या परिषदेत प्रकाशित केला.