
HMPV Virus : Covid 19 नंतर आता HMPV नावाच्या व्हायरसनं चीनमध्ये धुमाकूळ घातल्याच्या बातम्या येत आहेत. या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे, हे सांगता येत नाही. परंतू या व्हायरसचे तीन रुग्ण आढळून आल्याचं कन्फर्म झालं आहे. यांपैकी दोन संसर्गबाधित कर्नाटकात तर एक जण गुजरातमध्ये आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर देशातील अनेक रुग्णालयांमध्ये आणि राज्यांच्या आरोग्य मंत्रालयांनी सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. पण खरंच हा HMPV व्हायरस किती धोकादायक आहे? खरंच यामुळं चिंतेची स्थिती आहे का? याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.