Weight Loss : काही केल्या वजन कमी होत नाहीये ? म्हणजे बिघडलंय तुमचं मानसिक आरोग्य

आपल्या मेंदूमधून स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतो. हा हार्मोन जास्त प्रमाणात सोडल्यामुळे शरीरातील इतर हार्मोन्सच्या कामात अडथळा निर्माण होतो.
Weight Loss
Weight Loss sakal

मुंबई : निरोगी राहण्यासाठी आपले वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वजन वाढल्याने आरोग्यावर वाईट परिणाम होतो. यामुळे आपले शरीर अनेक आजारांच्या विळख्यात येऊ शकते.

चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. वजन कमी करण्यासाठी काय खावे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याबद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे.

पण तुम्हाला माहीत आहे का की वजन कमी होण्यासाठी किंवा वाढण्यामागे आपला आहारच कारणीभूत असतो असे नाही तर आपले मानसिक आरोग्यही यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

जर तुम्ही योग्य आहार घेत असतानाही तुमचे वजन कमी होत नसेल तर तुमचे मानसिक आरोग्य हे याचे कारण असू शकते. तुमचे पोषण आणि शारीरिक आरोग्याप्रमाणेच मानसिक आरोग्यही योग्य असणे खूप गरजेचे आहे.

आहारतज्ज्ञ सिमरन कौर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबतची माहिती शेअर केली आहे. हेही वाचा - Types of Vedas: वेदांचे प्रकार (how mental health affects body health)

Weight Loss
Weight Loss : फक्त एका महिन्यात कमी होईल वजन; असा घ्या आहार

वजन कमी होणे आणि मानसिक आरोग्य यांचा काय संबंध आहे ?

मानसिक आरोग्याचा आपल्या शरीरावर अनेक प्रकारे परिणाम होतो, त्यापैकी एक म्हणजे आपले वजन. जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या वजनावर होतो.

तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन जास्त प्रमाणात बाहेर पडतो, त्यामुळे इतर हार्मोन्सच्या लेव्हलवरही परिणाम होतो आणि शरीरातील हार्मोनल बॅलन्सही बिघडतो.

आपल्या मेंदूमधून स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतो. हा हार्मोन जास्त प्रमाणात सोडल्यामुळे शरीरातील इतर हार्मोन्सच्या कामात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे आपले वजन कमी करणे शक्य होत नाही.

Weight Loss
Menopause Care : रजोनिवृत्तीचा काळ सोपा करण्यासाठी रुजुता दिवेकरच्या टीप्स

याशिवाय मेलाटोनिन हार्मोन, डोपामाइन हार्मोन आणि सेरोटोनिन हार्मोन, ज्यांना आनंदी हार्मोन्स देखील म्हणतात, यांवरही परिणाम होतो.

यातील व्यत्ययाचा आपल्या झोपेवरही परिणाम होतो आणि त्यासोबतच मूड स्विंगची समस्या देखील उद्भवू शकते. अयोग्य झोपेचे चक्र वजन कमी करण्यावर देखील परिणाम करते.

अनेकवेळा आपण तणावाखाली काहीही खात नाही, काहीवेळा आपण खूप खातो आणि याचा परिणाम वजनावर होतो.

हे काम करा

मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी त्याकडेही लक्ष द्या. जर तुम्ही बऱ्याच काळापासून तणावाखाली असाल, काही चिंता तुम्हाला त्रास देत असेल तर कोणाशी तरी बोला.

तणावाची कारणे ओळखा. त्यावर मात करण्यासाठी योग, ध्यानाची मदत घ्या. तुम्हाला मदत हवी असल्यास एखाद्या तज्ञाची मदत घ्या.रुज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com