

Effects Of Stress On Heart: आजकालच्या धावपळीच्या जीवनात ताण येणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. ज्यामुळे नवीन समस्या सोडवण्यास मदत करते किंवा परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करते. पण तुमच्यावर अधिक ताण असेल तर हृदयासंबंधित अनेक आजार उद्भू शकतात. ताणामुळे अॅड्रेनालाईन आणि कॉर्टिसोल सारख्या संप्रेरकांचे स्राव सुरू होते, ज्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयाचे ठोके जलद होतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. जेव्हा ताण दीर्घकाळ राहतो, तेव्हा तो सतत उच्च रक्तदाब निर्माण करू शकतो आणि तुमच्या हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवर ताण वाढवू शकतो. ताण वाढल्यास हृदयासाठी कसा घातक ठरू शकतो हे जाणून घेऊया.