Health News : मिठाचे पाणी रोज पिल्याने आरोग्याला दुहेरी फायदे होतात; कसे जाणून घ्या... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Health news

Health : मिठाचे पाणी रोज पिल्याने आरोग्याला दुहेरी फायदे होतात; कसे जाणून घ्या

निरोगी शरीरासाठी पाणी अतिशय महत्वाचे आहे. परंतु या पाण्यात थोडेसे मीठ टाकल्यास त्याची चव आणि फायदे दुप्पट होतात. मिठाचे पाणी पिण्याचे अनेक फायदे होतात. विशेषत: याने शरीराची सूज, घसादुखी, पचनाच्या समस्यांवर मात करता येते. याशिवायही अनेक समस्या दूर करण्यासाठी मीठाचे पाणी फायदेशीर मानले जाऊ शकते. दरम्यान, आज आपण मिठाच्या पाण्याचे फायदे पाहणार आहोत. आरोग्यासाठी हे पाणी कसे उपयोगी पडते ते जाणून घेणार आहोत.

  • मिठाचे पाणी पिण्याचे फायदे

घसा खवखवण्यापासून आराम

मीठाचे पाणी प्यायल्याने घसादुखीपासून आराम मिळतो. मीठाच्या पाण्याचे सेवन केल्याने घशातील सूज, खाज आणि वेदना यापासून आराम मिळतो. यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास मीठ पाणी प्या.

हेही वाचा: Vastu Tips : घरामध्ये चुकूनही अशाप्रकारे ठेवू नका चपला-बूट, संकटांना तोंड द्यावे लागेल..

पचनक्रिया निरोगी ठेवा

पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासाठी मीठ पाणी प्या. त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन यांसारख्या समस्या दूर होतात. ते वापरण्यासाठी, 1 ग्लास पाणी घ्या. त्यात थोडे काळे मीठ किंवा रॉक मीठ घाला. त्यानंतर हे पाणी प्यावे. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारू शकते.

मेंदू निरोगी ठेवा

मिठाचे पाणी प्यायल्याने तुमच्या मेंदूलाही खूप फायदा होतो. यामुळे मेंदूचा विकास होईल. यासोबतच तणाव आणि नैराश्यही कमी होईल.

शरीर हायड्रेटेड ठेवा

तुमच्या शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी मीठ पाणी प्रभावी आहे. याच्या मदतीने तुम्ही डिहायड्रेशनच्या समस्येवर मात करू शकता. मीठामध्ये असलेले सोडियम आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीरातील द्रवपदार्थ संतुलित करतात, ज्यामुळे शरीराला हायड्रेट करता येते.

हेही वाचा: मनगटावरचे घड्याळही नशीब बदलेल; हातात घालण्याचीही आहे पद्धत, पहा कशी?

सूज कमी करा

मिठाचे पाणी प्यायल्याने शरीराची सूज कमी होते. मिठात असलेले मॅग्नेशियम शरीरातील जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. विनाकारण शरीरात सूज येत असेल तर मिठाच्या पाण्याचे सेवन करा.

टॅग्स :health newssalthealth