Immunity Power : तुमचीही रोग प्रतिकारशक्ती कमी आहे? मग तुम्ही हे वाचायलाच हवं

रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याविषयी जाणून घेऊया.
Immunity Power
Immunity Powersakal

Immunity Power : धकाधकीच्या जीवनात माणूस खाण्या पिण्याकडे सहसा दुर्लक्ष करतो. यातच जर सतत बसून काम आणि त्यात जंकफूड , पिझ्झा , बर्गर यासारखे खाद्यपदार्थ खाण्याची आवड असली की संसर्ग होऊन आजारी पडण्याचं प्रमाणही वाढतं.

डॉक्टरांनी कितीही औषधं दिली तरी पेशंटमधील उपजत रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही उपाययोजना आणि पथ्यं पाळणं आवश्यक आहे. नेमकी रोग प्रतिकारशक्ती म्हणजे काय आणि त्यावर होणारा परिणाम तसेच ती कशी निर्माण करता येईल, याविषयी जाणून घेऊया. (how to boost immune system read story healthy lifestyle)

रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय?

शरीरात कोणताही जंतूसंसर्ग, तसेच अॅलर्जी यापासून सरंक्षण करण्याचं काम म्हणजेच प्रतिकारशक्ती. रोग प्रतिकार किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते किंवा विविध गोष्टींमुळे शरीरात होणारी रिअॅक्शन यांना अडवण्याचं काम प्रतिकारशक्ती करीत असते.

प्रतिकारशक्तीचे दोन प्रकार असतात .

पहिला प्रकार म्हणजे निसर्गतः जन्मत: मिळणारी शक्ती. म्हणजेच शरिरात असणारा बोन मॅरो. हा रक्तातील जंतू किवा नको असलेल्या पेशी शोधून त्यावर रिअॅक्शन देत असतो.

दुसरा प्रकार म्हणजे अनुकूली प्रतिकारशक्ती (अ‍ॅडॉप्टिव्ह इम्युनिटी) ज्याला अधिग्रहित प्रतिकारशक्ती देखील म्हणतात, या प्रकारची प्रतिकारशक्ती कालांतराने विकसित होते आणि लसीकरणाद्वारे ती वाढवता येते.

Immunity Power
How To Lose Belly Fat : पोटाची ढेरी वाढली आहे? 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

प्रतिकारशक्ती कशी वाढवायची ?

  • नुसतंच काम न करता संपूर्ण पौष्टिक आहार, यात फळ आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. रोज एक फळ खाणं आवश्यक आहे.

  • आहारामध्ये जंक फूड असलं तरी, आठवड्यातून अगदी एक किंवा दोन वेळाच.

  • आहाराची वेळ निश्चित असावी.

  • तसेच २४ तासात कमीतकमी आठ तास झोप आवश्यक आहे. यात शरीराची झालेली झीज भरून निघते.

Immunity Power
Heightwise Women Weight : उंचीनुसार स्त्रीचं वजन नेमकं किती असायला हवं? वाचा तज्ञ काय म्हणतात...
  • तसेच मेटाबॉलिझम साधारण राहतो. अपुऱ्या झोपेमुळे हृदयासह मेंदूवर जास्त दुष्परिणाम दिसून येतात.

  • खाऊन आलेली ऊर्जा खर्च करणं हे गरजेचं असत. २४ तासात एक तास व्यायाम करणं अत्यंत गरजेचं आहे.

  • शरीराचा समतोल साधण्यासाठी प्रतिकारशक्ती गरजेची आहे.

  • आधुनिक काळात नवीन नवीन येणाऱ्या जंतूंचा प्रतिकार करण्यासाठी औषधं, उपचारांपेक्षा नैसर्गिकरित्या आजार टाळता आले पाहिजेत.

    - डॉ. अमित भोरकर

    आहारतज्ञ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com