Panic Attacks : तुम्हालाही येतात का पॅनिक अटॅक, पहिल्यांदाच पॅनिक अटॅक आल्यास परिस्थिती कशी हाताळाल?

पॅनिक अटॅक घातक नसले तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो
Panic Attacks
Panic Attacks esakal

Panic Attacks : पॅनिक अटॅकची समस्या अनेकांना उद्भवते. पॅनिक अटॅक ही एक प्रकारची एन्झायटी आहे. यात हृदयाचे ठोके वाढतात. श्वास फुलून तुम्हाल गिरकी येऊ शकते. काहींचे संपूर्ण शरीर थरथरायला लागतं. अशा परिस्थिती नेमके काय करावे याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

एन्झायटी, स्ट्रेस या गोष्टी कधीच हलक्यात घेऊ नका. पुढे या समस्या तुमच्या मानसिक आरोग्य बिघडवू शकतात. यातील एक समस्या म्हणजे पॅनिक अटॅक. कुठल्याही गोष्टीबाबत तुम्ही फार घाबरत असाल किंवा ते पॅनिक अटॅकचं कारण ठरू शकतं. हा अटॅक हार्ट अटॅकप्रमाणेच रूग्ण अनुभवतात. पॅनिक अटॅक घातक नसले तरी तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. या परिस्थिती स्वत:ला कसे सांभाळायचे ते जाणून घेऊयात.

पॅनिक अटॅक आल्यास असे स्वत:ला सांभाळा

दीर्घ श्वास घ्या आणि ठोके मोजा

तुमच्या आजूबाजूला एखाद्याला पॅनीक अटॅक येत असल्यास, त्यांना बसायला सांगा आणि दीर्घ श्वास घेत आणि हळू हळू हृदयाचे ठोके मोजा. जर तुम्ही एकटे असाल आणि तुम्हाला पॅनिक अटॅक येत असेल तर तुम्हाला हा उपाय स्वतःच करून पाहावा लागेल. आत आणि बाहेर एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सामान्य होईपर्यंत मोजत रहा. (Health)

Panic Attacks
Heart Attack : हृदयविकाराचा झटका आलेल्या दहा वारकऱ्यांचे प्राण वाचविण्यात यश

बर्फ किंवा थंड पाण्याने स्वतःला ओले करा

पॅनीक अटॅकमध्येही थंड पाणी फार फायदेशीर ठरते. पॅनिक अटॅक आल्यास चेहरा थंड पाण्याने धुवावा. जर ते बर्फाचे पाणी असेल तर आणखी चांगले. चेहऱ्यासह मान पुसून टाका. आपल्या डोक्यावर एक थंड टॉवेल ठेवा. असे केल्यास तुम्हाला बऱ्यापैकी आराम मिळेल.

Panic Attacks
Heart Attack Vs Panic Attack : हार्ट अटॅक अन् पॅनिक अटॅकमध्ये नेमका काय फरक आहे? जाणून घ्या अतंर अन् धोका

फिजीकल अॅक्टिव्हिटी करा

जर तुम्हाला याआधी कधीही पॅनीक अटॅक आला असेल, तर ही परिस्थिती पुन्हा टाळण्यासाठी शारीरिक व्यायामाला तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवा. शारीरिक हालचाली केल्याने एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे मनःस्थिती सुधारते आणि मन शांत होते. तणाव आणि चिंता कमी करून, पॅनीक अटॅकचा धोका देखील कमी होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com