Arm Fat : दंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम, लवकरच दिसेल फरक

ही चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल.
Arm Fat
Arm Fatsakal

लठ्ठपणामुळे शरीराच्या जवळपास प्रत्येक भागात चरबी वाढते. हे कमी करण्यासाठी लोक जिममध्ये तासनतास घाम गाळतात. पोटाच्या चरबीप्रमाणेच हाताची चरबी कमी करण्यासाठीही खूप मेहनत करावी लागते. हातावर लटकलेली चरबी खूप वाईट दिसते. ही चरबी कमी करण्यासाठी तुम्ही काही सोपे व्यायाम करू शकता. ज्याच्या मदतीने तुम्हाला काही दिवसात फरक दिसू लागेल. चला तर मग जाणून घेऊया हातावरील चरबी कशी कमी करायची.

ट्रायसेप्स डिप्स

या व्यायामामध्ये तुम्हाला एक खुर्चीची गरज भासते. दोन्ही हात खुर्चीच्या काठावर ठेवा आणि आपले शरीर त्या आधारावर वर आणि खाली करा. यामुळे हाताच्या मांसपेशीवर जोर येतो आणि हाताची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

Arm Fat
Health Care News: पावसाळ्यात जांभूळ खाल्ल्यानं कमी होतेय रक्तदाबाची समस्या; वाचा अन्य फायदे!

पुशअप्स

पाय, हात आणि तुमच्या मणक्यासाठी पुशअप्स हा सर्वात प्रभावी व्यायाम आहे. हा व्यायाम करण्यासाठी आधी पोटावर झोपा. नंतर शरीर उचला आणि फक्त तळहात आणि पायाची बोटे जमिनीवर ठेवा. 2-3 मिनिटे या स्थितीत रहा. यामुळे तुमच्या हातावरील फॅट सहज कमी होईल.

बायसेप कर्ल

हाताची जास्त असलेली चरबी दूर करण्यासाठी तुम्ही बायसेप कर्ल व्यायाम करू शकता. यासाठी तुम्ही डंबेल खांद्यापर्यंत उचला आणि पुन्हा खाली घ्या. सुरुवातीला आपण 10-12 वेळा करू शकता, हळूहळू संख्या वाढवा. हातावरील चरबी त्वरीत कमी होण्यास सुरूवात होते.

Chitra kode:

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com