Child Health : आईच्या अनुवांशिक थॉयरॉइडपासून बाळाचे संरक्षण कसे कराल ?

या थेरपीमुळे, तुमच्या थायरॉइड संप्रेरकाची अधिकची मात्रा तुमच्या बाळाच्या रक्ताभिसरणातून बाहेर ठेवली जाते.
Child Health
Child Healthgoogle

मुंबई : जर तुम्ही गरोदर असाल किंवा गरोदर राहण्याचा विचार करत असाल तर थायरॉइडविषयी तुमच्या मनात अनेक शंका उद्भवू शकतात. थायरॉइड संप्रेरक पातळी कमी झाल्याने प्रजननक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

थायरॉइड हा गर्भधारणेदरम्यान तुमच्या बाळासाठी घातक ठरु शकतो. आजकाल बहुतेक रूग्णांना सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझम दिसून येतो म्हणजे हार्मोनची कमतरता असूनही त्यांना लक्षणे दिसत नाहीत.

कमी सक्रिय असलेल्या थायरॉइडचे निदान साध्या रक्त तपासणीद्वारे केले जाऊ शकते आणि दररोज फक्त एक गोळी घेऊन त्यावर उपचार केले जाऊ शकतात. हेही वाचा - 'नाटू नाटू..'ला मिळाला पुरस्कार..पण पुढे काय ?

Child Health
Thyroid Symptoms : बऱ्याचशा स्त्रियांना माहीत नसतात थायरॉइडची ही १२ लक्षणे

थायरॉइड ग्रंथी तुमच्या मानेजवळ असते. हे थायरॉइड संप्रेरक टी ३ आणि टी ४ तयार करते, ज्याचा तुमच्या चयापचयवर प्रक्रियेवर परिणाम होतो किंवा तुमचे शरीर ऊर्जा कसे साठवते आणि वापरते यानुसारही संप्रेरकाची पातळी बदलते.

जेव्हा पातळी कमी असते तेव्हा थायरॉइडला अधिक थायरॉइड संप्रेरक तयार करण्यास सांगण्यासाठी मेंदू टिएसएच सोडतो. एखादी स्त्री गर्भधारणेची तयारी करते तेव्हा तिला आधीपासून अस्तित्वात असलेल्या आजारांवर उपचार करण्याचा सल्ला दिला जातो.

हाशिमोटो थायरॉइडायटिस किंवा थायरॉइड कर्करोग असलेल्या व्यक्ती गर्भधारणेची तयारी करत असल्यास बाळाला सुरक्षित कसे करावे याविषयी सांगत आहेत मदरहूड रुग्णालयाचे एन्डोस्कोपिक सर्जन डॉ. जैनेश.

गरोदरपणात हायपरथायरॉइडिझम प्रमाणात असेल तर उपचारांची गरज भासत नाही. मात्र हायपोथायरॉइडिझम अधिक असल्यास डॉक्टरांनी थायरॉइड संप्रेरकाचे प्रमाण कमी करणारी अॅण्टिथायरॉइड औषधांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.

या थेरपीमुळे, तुमच्या थायरॉइड संप्रेरकाची अधिकची मात्रा तुमच्या बाळाच्या रक्ताभिसरणातून बाहेर ठेवली जाते. तुम्हाला योग्य डोस मिळत असल्याची खात्री करण्यासाठी तुमच्या बाळाचे वेळोवेळी निरीक्षण करा आणि याकरिता एंडोक्रिनोलॉजिस्ट किंवा माता-गर्भाच्या औषधासंबंधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Child Health
Women Life : स्त्रीदेहाबद्दल या गोष्टी पुरूषच काय पण स्वत: महिलांनाही माहीत नसतात

आईवर उपचार करण्यासाठी, थायरॉइड संप्रेरक बदलण्याची पद्धत वापरली जाते. थायरॉइड हार्मोन रिप्लेसमेंट उपचाराचा डोस रुग्णातील थायरॉइड संप्रेरकांच्या संख्येनुसार निर्धारित केला जातो.

गर्भधारणेदरम्यान, थायरॉइड संप्रेरकांची पातळी बदलू शकते. थायरॉइड रिप्लेसमेंट थेरपीचा डोस देखील बदलू शकतो. आई आणि गर्भ दोघांनाही सुरक्षित आणि आवश्यक थेरपी मिळणे आवश्यक आहे. थायरॉइड संप्रेरक पातळीची चाचणी सर्व नवजात बाळांसाठी नियमित तपासणीचा भाग आहे.

गर्भधारणेदरम्यान थायरॉइड विकारांवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या बहुतेक औषधांमुळे बाळाला इजा होत नाही. थायरॉइड औषधे आपल्या शरीरात थायरॉइड संप्रेरकांची योग्य संख्या असल्याची खातरजमा करण्यास मदत करू शकतात.

तुम्ही गरोदर असताना तुमच्या टिएसएच, एफटी ३ आणि एफटी ४ पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी तुमच्या औषधांचा डोस योग्य आहे याची खात्री करण्यासाठी रक्त तपासणीचा सल्ला दिला जातो.

हल्ली हायपोथायरॉइडिझमचे सर्वात सामान्य कारण म्हणजे ऑटोइम्यून त्यामुळे प्रत्येक रुग्णाची एकदा अँटी-थायरॉइड अँटीबॉडीजची तपासणी करणे आवश्यक आहे.

सामान्यतः, हार्मोनची मागणी पूर्ण करण्यासाठी गर्भधारणेदरम्यान डोसमध्ये २५% वाढ केली जाते. बाळाची प्रसूती होताच महिला गर्भधारणेपूर्वीचा लेव्होथायरॉक्सिनचा डोस घेणे पुन्हा सुरू करू शकते.

हायपोथायरॉइडिझम असलेल्या महिलांसाठी गर्भवती होणे अधिक आव्हानात्मक आणि धोकादायक असू शकते. तथापि, हायपोथायरॉइडिझम हा प्रतिबंध करण्यायोग्य आहे.

गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांशी आपल्या थायरॉइड स्थितीबद्दल चर्चा करा. जर तुमची गर्भधारणा झाली असेल तर तुमची थायरॉइड स्थिती तपासा आणि तुम्ही थायरॉइड औषध घेत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

सूचना - या लेखातील माहिती फक्त सामान्य ज्ञानासाठी आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधोपचारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com