Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका | Healthy Lifestyle | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cholesterol

Cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढलंय? 'या' गोष्टी चुकूनही खाऊ नका

कोलेस्ट्रॉल हे चांगलं आणि वाईट असं दोन्ही प्रकाराचं असतं. वाईट कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरावर गंभीर परिणाम करतं. त्यामुळे आपल्यालाअनेक आजार होण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल हे चुकीच्या खाण्याच्या पद्धतीने होत असते. जर तुमचे कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तुम्ही काही गोष्टी चुकूनही खाऊ नये. चला तर जाणून घेऊया. (if you have high cholesterol never eat these things read story)

हेही वाचा: Cholesterol : लाईफस्टाईलच्या ‘या’ चुकीच्या सवयीमुळे येतो कमी वयात Heart Attack

लाल मास खाणे टाळावे

जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्ही लाल मास खाणे टाळले पाहीजे. लाल मास म्हणजे मटण मेंढी, डुक्कर, गोमांस यांचं मास, यांचं सेवेन करणे टाळावे.

दुधापासून बनविलेल्या पदार्थांचे सेवन कमी करावे

जर तुमचं कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्ही दुधापासून बनविलेले दुग्धजन्य पदार्थ खाणे टाळावे. दुग्धजन्य पदार्थांमुळे वाईट कोलेस्ट्रोल वाढते. त्यामुळे कोलेस्ट्रोल वाढल्यावर दुधाच्या पदार्थांचं खाऊ नये.

हेही वाचा: Cholesterol : तरुणवर्गाला काेलेस्‍ट्रॉलचा धोका; लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाब कारणीभूत

चिकन खाऊ नये

अनेकजण चिकनप्रिय असतात पण जर तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढलं असेल तर तुम्ही चिकन खाणं बंद करावे. कोलेस्ट्रॉल वाढलं असताना चिकन खाऊ नये यामुळे रक्तप्रवाहात अडथळे येण्याची शक्यता वाढते.