Immune System : पुरुषांची की महिलांची, कोणाची इम्यून सिस्टिम असते स्ट्राँग? जाणून घ्या सविस्तर

दीर्घ आयुष्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
Immune System
Immune Systemesakal

Immune System : आयुष्यात प्रत्येक व्यक्ती हा कधीना कधी आजारी पडतोच. मात्र वारंवार आजारी पडण्याचं कारण आता पुढे आलंय. नेचरमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार आपल्या शरीरात असलेली 'इम्यून रेझिलन्स' यंत्रणा यासाठी जबाबदार आहे.

यामुळे संसर्ग किंवा इतर रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या क्षमतेवर याचा परिणाम होऊ शकतो. ज्या लोकांमध्ये ही प्रणाली मजबूत असते, त्यांच्यात रोगांशी लढण्याची क्षमता जास्त असते. दीर्घ आयुष्यासाठी हा सर्वात महत्वाचा घटक आहे.

अभ्यासाचे मुख्य संशोधक आणि टेक्सास विद्यापीठातील मेडिसिनचे प्राध्यापक सुनील आहुजा म्हणतात – हा शोध हृदयविकार, संक्रमण, कर्करोग यांसारख्या आजारांच्या प्रतिबंधासाठी नवीन प्रभावी उपचार शोधण्यात मदत करेल. संशोधकांनी सर्व वयोगटातील 50,000 लोकांच्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी करून हा निकाल काढला आहे.

Immune System
Immunity Boost Tips : कोरोनाच्या BF.7 व्हेरिएंटचा वाढता धोका; अशी वाढवा इम्युनिटी

इम्यून सिस्टिम मजबूत कशी बनवाल?

नियमित व्यायामामुळे ही प्रणाली अधिक प्रभावी होऊ शकते. डॉ. सुनील आहुजा WebMD ला सांगतात की, इम्यून सिस्टिम ही अनुवांशिक आहे. चांगले अन्न आणि नियमित व्यायामामुळे ते अधिक प्रभावी होऊ शकते. (Immunity Booster)

व्यायाम करताना आणि व्यायाम करत नसताना घेतलेल्या रक्ताच्या नमुन्यांचे विश्लेषण असे दर्शविते की जेव्हा लोक नियमित व्यायाम करतात तेव्हा ते दीर्घकाळ तुंदुरुस्त राहतात. तुम्ही व्यायाम थांबवताच, तुम्ही पुन्हा शून्यावर पोहोचता. म्हणजेच वैयक्तिक शिस्त खूप महत्त्वाची आहे.

Immune System
Immunity Power : तुमचीही रोग प्रतिकारशक्ती कमी आहे? मग तुम्ही हे वाचायलाच हवं

पुरुषांमध्ये की महिलांमध्ये असते स्ट्राँग इम्यूनिटी सिस्टिम?

ही प्रणाली महिलांमध्ये पुरुषांपेक्षा अधिक मजबूत आहे. आपण लोकांना 4 गटांमध्ये विभागू शकतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असते आणि संसर्गाचा धोका कमी असतो त्यांचे आयुष्य जास्त असते. कमी प्रतिकारशक्ती असलेले आणि संक्रमणाचे उच्च दर असलेले लोक दुर्दैवाने कमी जगतात. ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त असते आणि संसर्गाचा धोका जास्त असतो त्यांचे आयुष्य मध्यम असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com