फक्त अंड-पनीर नव्हे, भरपूर Protein असलेल्या 'या' ४ डाळी खा

वजनही होईल कमी, ताकदही मिळेल
These 4  Foods have High Protein lentils
These 4 Foods have High Protein lentils

World Pulses Day : शरीराला निरोगी आणि काम करण्यासाठी सक्रिय ठेवण्यासाठी अनेक पोषक तत्वांननुसार, प्रथिनांची (Protein) गरज असते. प्रथिने अवयवांपासून ते स्नायू, ऊती, हाडे, त्वचा आणि केसांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आवश्यक असतात. प्रथिने (protein)आपल्या रक्तामध्ये आपल्या पूर्ण शरीरासाठी ऑक्सिजन(Oxygen) वाहून नेतात. तसेच अॅन्टीबॉजी बनविण्यासाठी मदत करत असेल तर जे संक्रमण आणि आजारांसोबत लढण्यासाठी आणि पेशींना निरोगी ठेण्यासाठी मदत करतो.. काही लोक मानतात की, फक्त अंडे आणि पनीरमध्येच भरपूर प्रथिने असतात पण असे काही नाही. तुम्ही रोज एखादी डाळीचे (Pluses) सेवन करू शकता ज्यामधून तुम्हाला भरपूर प्रथिने मिळू शकतील. (include these 4 high protein lentils or dal in your diet to weight loss and muscle gain fast)

These 4  Foods have High Protein lentils
Men's Health : पुरुषांच्या आरोग्यासाठी 'ही' फळे खाणे फायदेशीर!

आहारमध्ये पुरेशी प्रथिने न मिळाल्यास आरोग्यासंबधीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, उतींचे नुकासान होऊ शकते आणि स्नायूंना नुकसान पोहचू शकते.

तुम्हाला माहितीये का शरीराला रोज किती प्रोटीन मिळायला हवे? असे मानले जाते की, ४ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुलांना १३ ग्रॅम, ४ ते ८ वर्षांच्या मुलांना १९ ग्रॅम, ९ ते १३ वर्षाच्या मुलांना ३४ ग्रॅम, १४ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्या महिला आणि मुलींना ४६ ग्रॅम, १४ ते १८ वर्षाच्या मुलांसाठी ५२ ग्रॅम, १९ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्यांसाठी ५६ ग्रॅम प्रथिने मिळायला पाहिजे.

सोप्या शब्दामध्ये सांगायचे झाले तर, त्यामुळे बहुतेकदा प्रत्येकाला त्यांच्या कॅलरीजपैकी 10% ते 35% प्रथिनांच्या रूपात दररोज मिळायला हवे. वाहन चालविण्यासाठी, वजन उचलण्यासाठी, धावणे अशी कामे करताना अधिक कॅलरीजची आवश्यकता असते पण प्रथिनांची टक्केवारी मर्यादीत असते. कित्येक अभ्यासातून समोर आले की वजन कमी करण्यासाठी आणि पचन क्रिया सुधारण्यासाठी प्रथिनांची आश्यकता असते

These 4  Foods have High Protein lentils
Mental Health : पुरुषही रडू शकतो, त्यालाही असते मानसिक आधाराची गरज!

डाळींमधून मिळतात भरपूर प्रथिने (High Protein Diet)

मेडिकल न्युज टूडेनुसार, डाळीचे सेवन करण्यासाठी विभिन्न आरोग्याच्या समस्या कमी होऊ शकतात. जर्नल ऑफ द अमेरिकन हार्ट असोशिएशनद्वारा केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार, संशोधकांनी असा निष्कर्ष काढला आहे की, जे लोक कडधान्ये सारख्या वनस्पतीवर आधारित पदार्थ जास्त खातात त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो. डाळ हे भारतातील प्रमुख अन्न आहे आणि इथल्या सर्व घरांमध्ये डाळ बनवली जाते. मसूर ही चवदार तर आहेच, पण आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. डाळीचे अनेक प्रकार आहेत आणि प्रत्येक डाळीचे स्वतःचे फायदे आहेत. डाळीमध्ये शरीरासाठी आवश्यक असलेले सर्व पोषक आणि अँटीऑक्सिडंट असतात.

These 4  Foods have High Protein lentils
वजन नियंत्रणात आणायचायं ? डायटमध्ये समावेश करा 'हरभळा डाळ'
उडीद डाळ (काळी डाळ)
उडीद डाळ (काळी डाळ)

उडीद डाळ (काळी डाळ)

उडीद डाळीला काळी डाळ असेही म्हणतात. डाळ हे फोलेट आणि झिंकचे शक्तिशाली स्त्रोत आहेत. उडीद डाळीच्या प्रत्येक कपमध्ये १२ ग्रॅम प्रथिने असतात. रोज एक कप उडीद डाळ खा.


हिरवी मूग डाळ
हिरवी मूग डाळ

हिरवी मूग डाळ

मुग डाळीला हिरवी डाळ देखील म्हणतात कारण या डाळीची साल हिरवी असतेय ही डाळ साली शिवाय देखील मिळते त्या पांढरी मुग डाळ म्हणतात. या डाळीच्या प्रत्येक अर्ध्या कपमध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. हिरवी मुग डाळ ही लोहाचा एक शक्तिशाली स्त्रोत आहे. याशिवाय मूग डाळीमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.

These 4  Foods have High Protein lentils
गर्भावस्थेत डाळ खाण्याचे फायदे, जाणून घ्या
अख्खा मसूर
अख्खा मसूर

अख्खा मसूर

तपकिरी रंगाच्या या डाळीला अख्खा मसूर असेही म्हणतात. या डाळीच्या अर्ध्या कपमध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. ही डाळ शिजली की मऊ होते. ही डाळ भात आणि चपाती सोबत खाल्ली जाते. ही डाळ कार्बोहायड्रेट्स, फायबर, लोह आणि फोलेटचा उत्तम स्रोत आहे.

लाल मसूर, मसूर डाळ
लाल मसूर, मसूर डाळ

लाल मसूर, मसूर डाळ

लाल मसूर ही अशीच एक मसूर आहे जी मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते आणि ती तयार करणे देखील खूप सोपे आहे. ही मसूर लहान मुले आणि बाळांसाठी देखील एक चांगला पर्याय आहे. अर्धा कप लाल मसूरमध्ये 9 ग्रॅम प्रथिने असतात. मसूर सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत देखील आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे आणि कमी चरबीयुक्त आहार घ्यायचा आहे त्यांच्यासाठी ही मसूर योग्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com