

Atrial Fibrillation
ESakal
हृदयविकाराच्या उपचारांमधील एका मोठ्या टप्प्यावर मुंबईतील लिलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने ७७ वर्षीय रुग्णावर अॅट्रियल फायब्रिलेशन (एएफ) साठी पल्स्ड फिल्ड अॅब्लेशन (पीएफए) सोबत लेफ्ट अॅट्रियल अॅपेंडेज ऑक्लुजन (एलएएओ) ही भारतातील पहिली आणि अद्वितीय एकत्रित कार्डियाक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. ही वैद्यकीय कामगिरी गुंतागुंतीच्या हृदयविकार उपचारांमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे, यामुळे अनियमित ह्रदयस्पंदने आणि स्ट्रोकचा (पक्षाघात) धोका या दोन्ही समस्यांवर एकाच वेळी प्रगत, मिनिमली इन्व्हेसिव्ह शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणे शक्य झाले आहे.