तर काय?

मी २८ वर्षांचा आहे, मला खूप प्रमाणात अपचन होते, सतत ढेकर येतात, पोट साफ होत नाही, पोटात दुखत असते, जळजळ होत असते.
stomach problems
stomach problemssakal

मी २८ वर्षांचा आहे, मला खूप प्रमाणात अपचन होते, सतत ढेकर येतात, पोट साफ होत नाही, पोटात दुखत असते, जळजळ होत असते. मी खाण्या-पिण्याबाबत भरपूर काळजी घेतो, मित्रांबरोबर रात्री बाहेर जाणे टाळतो. पार्टी टाळतो. मला कुठलेही व्यसन नाही. तरीही अपचनाचा त्रास होतो. कृपया यावर उपाय सुचवावा.

- अभिषेक ठकार, मुंबई

उत्तर - इतक्या कमी वयात अशा प्रकारचा त्रास होतो आहे, याचा अर्थ घराण्यात अपचनाचा इतिहास असावा. गहू खाल्ल्ल्यामुळे किंवा मैद्याची वस्तू खाल्ल्यावर अशा प्रकारचा त्रास जास्त होतो का, याकडे लक्ष द्यावे. रात्रीच्या जेवणात ज्वारी, बाजरी, नाचणी याची भाकरी घेणे जास्त उत्तम राहील. डाळींमधील तूर डाळ, मूग डाळ व मसूर डाळ यांचा समावेश करणे उचित ठरेल. कडधान्यांचा वापर थोड्या दिवसांसाठी पूर्णपण टाळणे बरे.

आंबवलेल्या पदार्थ आहारात जेवढे कमी ठेवाल तेवढे जास्त बरे. जेवणापूर्वी मसाला लिंबू घेणे सुरू करावे. यासाठी लिंबू कापून त्यावर काळे मीठ, हिंग, जिरे व हळद टाकून छोट्या लोखंडी कढईत किंवा पाळीमध्ये मंद आचेवर गरम करावे. लिंबू व्यवस्थित गरम झाले व त्यातील रस खदखदतो आहे असे वाटू वाटले की लिंबू बाहेर काढून रस काढावा.

हा रस जेवणाआधी घेतल्याने अपचन, गॅसेस तक्रारी कमी होताना दिसतात. याची संपूर्ण माहिती डॉ. बालाजी तांबे यूट्यूब चॅनेलवर ‘अपचन व गॅस के लिये नींबू मसाला’ या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, ती अवश्य पाहावी. रात्री झोपताना सॅनकूल चूर्णासारखे एखादे चूर्ण नियमितपणे घेणे सुरू करावे, तसेच संतुलन अभ्यंग सेसमी सिद्ध तेलासारखे एखादे तेल पोटावर हलक्या हाताने गोलाकार दिशेत जिरवणे लाभदायक ठरू शकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com