इनर इंजिनिअरिंग : मानवतेचे भविष्य सांगणारी भृगुसंहिता

भृगू ऋषींची शिवभक्ती, पार्वतीचा संताप आणि अर्धनारीश्वरत्वातून उलगडणारे स्त्री-तत्त्वाचे गूढ; इनर इंजिनिअरिंग मानवी प्रणालीतील दोन्ही तत्त्वांना जागवण्याचा मार्ग दाखवते
Sadhguru

Bhrigu Samhita symbolizes devotion, inner transformation, and the balance of masculine and feminine energies.

sakal

Updated on

सद्‍गुरू : भृगू ऋषी हे भगवान शिवांचे पहिले सात शिष्य असणाऱ्या सप्तर्षींपैकी एक होते. शिवाप्रति असलेली स्वतःची भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी रोज शिवांना तीनदा प्रदक्षिणा घालणे हा त्यांचा नित्यक्रम होता. भृगू हे शिवांचे अत्यंत कट्टर भक्त होते आणि शिवांबाबत थोडे जास्तच आसक्त होते. एक दिवस त्यांनी विचार केला की, ‘मी पार्वतींना प्रदक्षिणा का घालू? शिवांच्या पत्नीशी माझा काहीच संबंध नाही. मला फक्त शिवांनाच प्रदक्षिणा घालायची आहे.’ म्हणून त्यांनी पार्वतींना बाजूला होण्यास सांगितले. याचा पार्वतींना खूप राग आला आणि त्यांनी नकार दिला. त्यामुळे भुगूंनी एका लहान पक्ष्याचे रूप घेतले आणि पार्वतींना वगळून केवळ शिवांनाच प्रदक्षिणा घालू लागले. शिव या गंमतीशीर परिस्थितीकडे पाहत होते, तर दुसरीकडे भृगू केवळ शिवांनाच प्रदक्षिणा घालण्यावर ठाम असल्याने पार्वती अधिकाधिक संतप्त होत होत्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com