Irritability: तुमची चिड चिड फार वाढलीय का? अशी दूर करा अन् राहा आनंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Irritability

Irritability: तुमची चिड चिड फार वाढलीय का? अशी दूर करा अन् राहा आनंदी

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात अनेक समस्यांना आपण तोंड देत असतो. घरातील जबाबदाऱ्या, ऑफिसवर्क आणि मानसिक थकवा या सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता अनेकदा तुमची चिड चिड वाढते. जर तुम्हाला कारण नसतानाही राग येत असेल तर हा फार चिंतेचा विषय ठरतो. तुम्ही याबाबत डॉक्टरांशी बोलायला हवं.

चि़डचिडेपणा ही मानसिक समस्या आहे. जेव्हा तुमच्या कुटुंबातील कोणी किंवा तुम्हीदेखील फार चिड चिड करायला लागता तेव्हा संपूर्ण कुटुंबात चिडचिडं वातावरण तयार होतं. नंतर कुटुंबातील अन्य सदस्यही तुम्हाला प्रतिउत्तर देण्यास सुरूवात करतात. खरं तुमची वाढती चिड चिड ही एखाद्या ठराविक विषयावरील चिड चिड नसून एखाद्या गंभीर आजाराचीही लक्षणं असू शकतात. मात्र अनेकजण याकडे दूर्लक्ष करतात. मात्र अशा व्यक्तीस उपचाराची गरज असते.

लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना ही समस्या असू शकते. या समस्येमुळे अनेक शारीरिक आजारही उद्भवू शकतात. तसेच मानसिकरित्याही तुम्ही आजारी असता. अनेकदा शारीरिक आजांमुळेही व्यक्तीची चिड चि़ड वाढते. लहान मुलांच्या कानाच्या किंवा नाकाच्या समस्या असतात. त्यामुळे मुलांची चिड चिड वाढते.

हेही वाचा: Vaginal health : योनीमार्गाचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी हे पदार्थ खा

चिडचिड हा सवय आहे की समस्या?

चिडचिडेपणा ही मेंटल आणि इमोशनल हेल्थ संबंधित समस्या असू शकते. तसेच ही समस्या फिजीकल हेल्थसंबंधितही असू शकते. प्रत्येकवेळी जर एखाद्याला चिडचिड होत असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नये.

ही काही लक्षणे दिसल्यास व्हा सावध

लहान लहान गोष्टींवरून पॅनिक होणे

कुठल्याही गोष्टीत लक्ष न लागणे

कारण नसताना राग येणे

लहान लहान गोष्टींवर अपसेट होणे

फार लवकर राग येणे

रागावर आवर नसणे

या समस्यांमुळे वाढतो चिडचिडेपणा

झोप पूर्ण न होणे

हॉर्मोनल इंबॅलेंस

जास्त स्ट्रेस असल्यामुळे

एंझायटी असल्यामुळे

शरीरात शुगर कमी होणे

हिमोग्लोबिनची कमी

बायपोलर डिसॉर्डरमुळे

सीजोफ्रेनियाची समस्या असणे

चिडचिडेपणा कसा कमी करावा

चिडचिडेपणा दूर करायचा असेल तर सर्वात आधी तुम्हाला उद्भवलेल्या समस्येचं कारण जाणून घेणं आवश्यक आहे. तसेच हेही क्लियर करून घ्या तुम्हाला असणारा त्रास हा मानसिक (Mental Health), भावनिक किंवा शारीरिक आहे काय? तुम्हाला कळत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हेही वाचा: Health: शरीरातील Toxins घालवण्यासाठी एक तासात किती पाणी प्यावे? एक्सपर्ट सांगतात फॉर्मूला

या काही पद्धतीने समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा

काही वेळासाठी एकांतात बसा.

स्वत;विषयी आणि स्वस्वत;च्या स्वप्नांविषयी विचार करा.

भविष्यात तुम्हाला काय करायचं आहे याचा विचार करा.

तुम्हाला ज्या गोष्टींचा त्रास होतो त्याच्यावर काय सोल्युशन काढता येईल त्याचा विचार करा.

तुमचा फ्रेंड सर्कल वाढवा.

तुमच्या आवडत्या गोष्टी करा.

वॉकवर जा, एक्झरसाइज करा.

नकारात्मक गोष्टींच्या दूर राहा.

कॅफिनचं सेवन अजिबात करू नका.

टॅग्स :mental health