कालभैरव ध्यान

कालभैरव किंवा काळभैरव हे भगवान शंकराचंच वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण रूप समजलं जातं. कालभैरव स्तोत्रावर जर्मनीमधे झालेल्या ‘मंत्रध्यान संशोधना’विषयीची घटना शिवभक्तांची, ध्यानसाधकांची श्रद्धा वाढवणारी ठरेल.
Shiv Shankar
Shiv ShankarSakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

कालभैरव किंवा काळभैरव हे भगवान शंकराचंच वेगळं, वैशिष्ट्यपूर्ण रूप समजलं जातं. कालभैरव स्तोत्रावर जर्मनीमधे झालेल्या ‘मंत्रध्यान संशोधना’विषयीची घटना शिवभक्तांची, ध्यानसाधकांची श्रद्धा वाढवणारी ठरेल.

योगशास्त्रावर व्याख्याने देण्यासाठी एका आंतरराष्ट्रीय योगतज्ज्ञांना जर्मनीला भेट देण्याची संधी मिळाली. त्यावेळी तिथले एक ज्येष्ठ योगसाधक आवर्जून त्यांना भेटायला आले.

त्यांना स्तोत्रं, मंत्र, बीजमंत्र यात विशेष रस आणि गतीही होती. ‘मंत्र, बीजमंत्र म्हणजे काय? तर एखाद्या ‘बी’मधे पूर्ण वॄक्ष सामावलेला असतो, त्याप्रमाणे मंत्राच्या प्रत्येक अक्षरात अनेक शक्ती एकवटलेल्या असतात,’ असं तज्ज्ञानी त्यांना सांगितलं. हे ऐकल्यावर त्या साधकानं जर्मनीत घडलेली, जुनी, साठ-सत्तर वर्षांपूर्वीची सत्यघटना त्यांना सांगितली.

फिनलॉंग नावाच्या शास्त्रज्ञ संशोधिकेनं जर्मनीत भारतीय विद्यार्थ्यांना कालभैरव स्तोत्रावर ध्यान करताना पाहिलं. पाहताना तीही वेगळ्याच भारावलेल्या स्थितीत गेली. तिच्या दॄष्टीनं हा फारच आनंददायी, दुर्मीळ अनुभव होता. तिच्यामधली संशोधनवॄत्ती जागॄत झाली. तिनं यावर सखोल अभ्यास करायचं ठरवलं. त्यासाठी एक रेखाचित्र काढणारं स्वयंचलित यंत्र तयार केलं.

या यंत्रात आरेखन करणारी एक पेन्सिल होती. त्या पेन्सिलीला आवाजाची सूक्ष्मातिसूक्ष्म कंपनं अतिशय बारकाईनं टिपणारा इलेक्ट्रॉनिक सेन्सर होता. हे आगळंवेगळं, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र तयार करण्यासाठी तिला खूपच यातायात करावी लागली. जर्मन लोक प्राच्यविद्या, वेद, आयुर्वेद शिकण्यासाठी घरदार सोडून भारतात येऊन राहतात.

मंत्रध्यानाचा वेध घेण्यासाठी या विदुषीनं उपसलेले कष्टही असेच कौतुकास्पद होते. या जिद्दी महिलेने शांत, माणसांचा वावर नसलेल्या जागेत या यंत्रासमोर विद्यार्थ्यांना बसवलं. त्यांना कालभैरव स्तोत्र म्हणत ध्यान करण्यास सांगितलं. सुरुवातीच्या प्रयत्नात, कागदावर उमटलेली रेखाचित्रं फारशी सुबक, स्पष्ट नव्हती.

तिनं या विद्यार्थ्यांना, एकाग्रता, धीरगंभीरता धारण करून स्तोत्राचं उच्चारण करत ध्यान करायला सांगितलं. अनेक प्रयत्नांनंतर, कागदावर प्रत्यक्ष कालभैरवाची प्रतिमा साकार झाली. या प्रसंगी त्या शास्त्रज्ञ बाईंचे इतर पाचसहा वैज्ञानिक मित्रही उपस्थित होते. प्रयोगाची माहिती संशोधिकेनं त्या काळातील सायन्स जर्नलमध्ये प्रसिद्धही केली.

हा प्रसंग सांगताना, जर्मनीतले ते ज्येष्ठ साधक अतिशय भावुक झाले होते. दुर्दैवानं या घटनेचा पुरावा (एखादा फोटो किंवा जर्नलची प्रत इत्यादी) आज त्यांच्याकडे उपलब्ध नाही. मात्र ओमकार, गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र या व अशा अनेक दिव्य सिद्धमंत्रांच्या श्रद्धापूर्वक, दीर्घकाळ केलेल्या साधनेचा विलक्षण अनुभव साधकाला अगदी नक्की मिळतो.

भारतात परतल्यावर योगतज्ज्ञांनी ही संशोधनाची माहिती विविध माध्यमांतून प्रसिद्ध केली. ती वाचून असंख्य योगसाधकांनी त्यांच्याशी संपर्क साधला. या संशोधनाबद्दल वाचून साधकांच्या मनातली श्रद्धा आणखीन दॄढ होईल. त्यांनी शिवरात्रीच्या निमित्ताने हे ध्यान करायला अवश्य सुरवात करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com