Infertility : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने खिशात मोबाईल ठेवता काय? ठरू शकतं नपुंसकतेचं कारण...l keeping mobile in pocket harmful to health cause infertility pregnancy heart problem know details | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Infertility in men

Infertility : तुम्हीही चुकीच्या पद्धतीने खिशात मोबाईल ठेवता काय? ठरू शकतं नपुंसकतेचं कारण...

Infertility : स्मार्टफोन हा काळाची गरज बनलाय. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात किंवा खिशात कायम हा मोबाईल असतोच. मात्र हा मोबाईल कितीतरी समस्यांचं कारण ठरु शकतं याची कल्पना तुम्हाला आहे काय? तेव्हा सर्वप्रथम मोबाइल व्यवस्थित जागी आणि व्यवस्थित पद्धतीने कसा ठेवायचा ते माहिती असणंही फार महत्वाचं आहे. आज आपण याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

फोनचा वापर इतका वाढला आहे की लोक तो टॉयलेटमध्येसुद्धा सोबत घेऊन जातात आणि जवळ ठेवण्यासाठी तो नेहमी खिशात ठेवतात. हे विशेषतः पुरुषांसोबत घडते. अनेक वेळा पुरुष घरात असतानाही खिशात फोन ठेवतात आणि बाहेर जातानाही ठेवतात.

मात्र खिशात मोबाइल ठेवणे हे पुरुषांना अगदी साधारण वाटत असलं तरी १०० पैकी १०० पुरुषांना त्याचे तोटे काय आहे याची अजिबात कल्पना नाहीये. एक्सपर्टच्या मते, जेव्हा वायरलेस नेटवर्कशी कनेक्टेड फोन तुम्ही खिशात ठेवात,तेव्हा तुमच्या शरीरात 2 ते 7 पट रेडिएशनच इन्सर्ट होतात.आणि फोन रेडिएशन देखील कर्करोगाचे एक कारण मानले जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हे रेडिएशन तुमची डीएनए रचना बदलू शकते. यामुळे नपुंसकत्वाचा धोका असतो आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

एक्सपर्टच्या मते, जर तुम्ही तुमच्या पॅन्टच्या खिशात सेलफोन ठेवलात तर त्याचे रेडिएशन तुमची हाडे, विशेषतः नितंबाची हाडे कमकुवत करू शकतात.

मग स्मार्टफोन ठेवायचा कुठे?

तुमचा फोन कोणत्याही खिशात ठेवू नका जिथून तुमचे नाजूक भाग जवळ आहेत. (Men Fertility) तुम्ही फोन पर्समध्ये किंवा बॅगेत ठेवल्यास उत्तम होईल, पण जर तुम्ही ते करू शकत नसाल तर सेलफोन मागच्या खिशात ठेवा. येथे फोन ठेवताना, हे देखील लक्षात ठेवा की त्याची मागील बाजू वर राहिली पाहिजे जेणेकरून तुमचे शरीर त्याच्या किमान रेडिएशनच्या संपर्कात येईल.