सकाळी रिकाम्या पोटी चहा पिताय? Bed Tea पिण्याचे तोटे, जाणून घ्या

Bed Tea
Bed Tea

Bed Tea Side Effects: चहा (Tea) पिण्यामध्ये एक वेगळीच नशा आहे, काही लोकांना दिवसाला कित्येक कप चहा लागतो. चहा शिवाय कित्येकांचा सर्वकाही अर्धवट वाटते. मग काही पाहूणे आल्यासा त्यांच्या स्वागतासाठी चहापाणी केले जाते. खूप लोक असेही आहेत जे बेड-टी (Bed-tea) घेतात. म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी(Empty stomach) चहा घेतात. शहर असो की गाव आज काल कित्येकांच्या घरांमध्ये बेटी टी कल्चर दिसून येते. पण तुम्हाला माहितीये का रिकाम्या पोटी चहा पिण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतो

onlymyhealth मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका लेखानुसार, सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने कोणत्या समस्या येऊ शकतात, जाणून घेऊ या.

Bed Tea
मासिक पाळीमध्ये वर्कआऊट करावे की नाही? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

थकवा आणि चिडचिड

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने उत्साह आणि ताजेपणा येतो असे वाटत असेल हा फक्त तुमचा गैरसमज आहे. असे केल्याने तुम्हाला पूर्ण दिवस थकवा जाणवतो आण यामुळे तुमचा मूडही खराब होऊ शकतो. त्यामुळे अशा समस्या टाळण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहाचे सेवन करू नका.

घाबरल्यासारखे होणे किंवा मळमळ होणे

सकाळी -सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्यामुळे घाबरल्यासारखे होणे किंवा मळमळ होते. कारण त्याचा पोटात Bile juice तयार करण्याच्या आणि काम करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. त्यामुळे या समस्यामुळे वाचण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहा बंद करा.

Bed Tea
फक्त लाल नव्हे तर, हिरवे टोमॅटोही खा, आरोग्यास अनेक फायदे

पचन क्रियेवर परिणाम

रिकाम्यापोटी चहा पिण्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांना नुकसान पोहचते. आपल्या आरोग्य आणि विशेषत: पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी या बॅक्टेरियासाठी महत्त्वाची भूमिका होते. पचन क्रिया व्यवस्थित काम करण्यासाठी आम्हाला रिकाम्यापोटी चहा पिणे टाळले पाहिजे

वारंवार लघवीची समस्या

सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यानेही वारंवार लघवीला जावे लागते. चहामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ डाईयरिटीक तत्त्व मिळले जातो. जे लघवी बनवण्याच्या प्रक्रियेला गती देते. शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि डिहायड्रेशनची समस्या देखील होऊ शकते.

श्वासाची दुर्गंधी

या सगळ्याशिवाय सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने अॅसिडीटी आणि तोंडाला दुर्गंधी येऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी चहा पिणे शक्यतो टाळावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com