लक्षणे सौम्य असूनही ओमिक्रॉन इतक्या वेगाने का पसरतोय? जाणून घ्या

omicron  varient
omicron varient e sakal

सध्या जगभरातील देश सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉनशी (Omicron) झुंज देत आहे, सध्या जगभरात कोविड-19 (Covid-19) रुग्णसंख्या पुन्हा विक्रमी उच्चांक गाठत आहेत. भारतालाही कोरोनाचा सामना करावा लागत आहे. तज्ञांच्या मते दिल्ली आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये आधीच साथीच्या आजाराची तिसरी लाट दिसून येत आहे. या दरम्यान दिलासादायक गोष्ट म्हणजे कोरोना बाधितांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण किरकोळ असून, बहुतेक संसर्ग झालेल्या लोकांना होम क्वारंटाईन (Home Quarantine) करण्यास सांगितले जात आहे कारण त्यांची लक्षणे सौम्य आहेत. याचा अर्थ Omicron प्रकार कमी तीव्र आहे का? तसेच, असे का होते? आज आपण या प्रश्नांची उत्तरे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ओमिक्रॉन तीव्रता कमी आहे का?

दक्षिण आफ्रिकेत नोव्हेंबरमध्ये प्रथम सापडलेला ओमिक्रॉन कोविड व्हेरिएंटची (Omicron Corona Variant) तिव्रता कमी असल्याचे संशोधनातून समोर येत आहे. तसेच अनेक संशोधनानुसार ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची (Hospitalization) गरज कमी प्रमाणात असते. डिसेंबरमध्ये, real-world COVID-19 UK data वर आधारित दोन अभ्यासांमध्ये ओमिक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कमी गंभीर आहे, आणि या प्रकरणांमध्ये खूप कमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता आहे.

इम्पीरियल कॉलेज लंडनच्या संशोधनात असे आढळून आले की, PCR- टेस्ट मध्ये Omicron पॉझिटिव्ह असलेले लोक डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) तुलनेत हॉस्पिटलमध्ये 40 ते 45 टक्के कमी रुग्णालयात दाखल होतात. आधी कोरोना न झालेल्या रुग्णांच्या तुलनेत होऊन गेलेल्या रुग्णांना ओमिक्रॉननंतर रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता 50 ते 60 टक्के कमी आहे.

एडिनबर्ग विद्यापीठ आणि स्कॉटलंडमधील इतर तज्ञांच्या आणखी एका संशोधनात, हॉस्पिटलमधील 15 लोकांच्या गटाच्या सॅम्पलच्या आधारे केलेल्या आभ्यासात असे समोर आले आहे की, डेल्टाच्या तुलनेत कोविड-19 हॉस्पिटलायझेशनच्या धोक्यात दोन-तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.दक्षिण आफ्रिकेतील डेटानुसार कोविड-19 ची लागण झालेल्या लोकांना इतर स्ट्रेनच्या तुलनेत ओमिक्रॉनसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागण्याची शक्यता 80 टक्के कमी असते.

omicron  varient
दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

ओमिक्रॉनला कमी गंभीर का मानतात?

सहा वेगवेगळ्या अभ्यासांमध्ये असे आढळले आहे की ओमिक्रॉन लोकांच्या फुफ्फुसांना डेल्टा आणि कोरोनाव्हायरसच्या इतर मागील व्हेरिएंटइतके नुकसान करत नाही. मात्र या सर्व अभ्यासांचे इतर शास्त्रज्ञांद्वारे सखोल अभ्यास करणे अद्याप बाकी आहे.

Deenan Pillay, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील व्हायरोलॉजीचे प्राध्यापक, द गार्डियनशी बोलताना सांगीतले की, मूळात ऑमिक्रॉन हा वरच्या श्वसनमार्गामध्ये असलेल्या घशातील पेशींना (upper respiratory tract) संक्रमित करत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ते फुफ्फुसातील पेशींपेक्षा घशातील पेशींमध्ये तो अधिक सहजतेने वाढतो. हे अगदी प्राथमिक आहे परंतु अभ्यासासातून हे समोर आले असल्याचे ते म्हणाले.

हाँगकाँग युनिव्हर्सिटीच्या फॅकल्टी ऑफ मेडिसिनमधील संशोधकांच्या टीमला असे आढळून आले की, ओमिक्रॉन प्रकार ब्रॉन्कस किंवा ट्यूब्समध्ये फास्ट प्रवेश करतो, ज्या वरच्या श्वासनलिका आणि फुफ्फुसांमधून जातात, परंतु फुफ्फुसाच्या टिश्यूमध्ये प्रवेशाचे प्रमाण खूपच कमी आहे. संशोधकांच्या मते, Omicron व्हेरिएंट कोरोनाच्या मूळ SARS-CoV-2 विषाणूपेक्षा 10 पट कमी कार्यक्षमतेने मानवी फुफ्फुसामध्ये प्रवेश करतो. ज्यामुळे रोगाची तिव्रता कमी आढळू शकते.

omicron  varient
सॅमसंगचा फ्लॅगशिप फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत

गेल्या आठवड्यात, अमेरिकन आणि जपानी शास्त्रज्ञांच्या एका गटाने हॅम्स्टर आणि उंदरांवर केलेल्या चांचण्याचा अहवाल प्रसिद्ध केला, ज्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंट किंवा पूर्वीच्या कोरोनाव्हायरस स्ट्रेनने संसर्ग झाला होता. ज्यांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला त्यांच्या फुफ्फुसाचे कमी नुकसान होते आणि त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी होती. मात्र संशोधकांना आढळून आले की कोरोनाच्या पूर्वीच्या व्हर्जनची लागण झालेला सीरियन हॅम्स्टर गंभीररित्या आजारी पडला आणि त्याच्यामध्ये coronavirus ची milder लक्षणे देखील होती.

ग्लासगोमधील एका टीमनुसार, त्यांना ओमिक्रॉन हा व्हेरिएंट फुफ्फुसाच्या पेशींना संक्रमित का करू शकत नाही याचे उत्तर त्यांना सापडले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, फुफ्फुसाच्या पेशींवर आढळणारे प्रथिन TMPRSS2 ज्याने सामान्यत: पूर्वीच्या SARS-COV-2 प्रकारांना फुफ्फुसाच्या पेशींमध्ये प्रवेश मिळविण्यात मदत केली ते ओमिक्रॉनला कमी मदत करत. म्हणूनच, त्यांच्या मते, नवीन व्हेरिएंटला पेशींच्या आत प्रवेश करणे आणि फुफ्फुसाच्या पेशींना संक्रमित करणे कठीण जात आहे.

ओमिक्रॉन वेगाने का पसरतोय ?

याचे उत्तर हे असू शकते की, ओमिक्रॉन हा वरच्या श्वासनलिकेमध्ये जास्त प्रमाणात केंद्रित असल्याने, खोकला, शिंकणे किंवा श्वसनमार्गाच्या या भागांमधून श्वास बाहेर टाकला जात आसल्याने इतर लोकांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

omicron  varient
एका युगाचा अंत! आजपासून BlackBerry फोन होणार बंद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com