

Prana: The Fundamental Source of Human Vitality
Sakal
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित.)
असे म्हणतात की, डोळ्यांनी दिसत नाही तर डोळ्यांमागे असणाऱ्या डोळ्यामुळे आपल्याला दिसू शकते. एखादी वस्तू केवळ ती आहे म्हणून दिसत नाही, तर त्यावर प्रकाश पडून परिवर्तित झाले की ती वस्तू दिसू लागते. बदल व विस्तार हा जीवनाचा मुख्य गुण आहे व ह्या दोन्ही गोष्टी शक्तीशिवाय शक्य नसतात, त्यामुळे शक्ती नसली, ऊर्जा नसली तर जीवन संभवत नाही. शक्तिउपासना ही भारतीयांची सर्वप्रथम पसंती आहे, तीच उपासनामार्गातील पहिली पायरी आहे व तेच अंतिम ध्येय आहे, असेही म्हणायला हरकत नाही.