Self Esteem : पुरुषांमध्येही आढळते आत्मसन्मानाची कमतरता, जाणून घ्या लक्षणे

आत्मसन्मान हा प्रत्येकाच्या आयुष्यातला फार महत्वाचा आणि जादूचा घटक आहे.
Self Esteem
Self Esteem esakal

Signs A Man Has Low Self-Esteem : आत्मसन्मान हा असा एक घटक असतो जो प्रत्येकाच्या आत जणू जादूई काम करत असतो. तो माणसाला नवं काही करण्याची प्रेरणा देतो, तर आत्मविश्वासही वाढवतो. यामुळे प्रत्येकात आत्मसन्मान असणे आवश्यक असते.

पण बऱ्याचदा आपण समाजात वावरताना आजूबाजूला बघतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की, आत्मविश्वास कमी पडतो, काम करू शकत असले तरी त्याचा विश्वास नसतो. असं का होतं, आत्मसन्मान कमी झाल्याची लक्षणे जाणून घ्या.

स्वतःचे अवमुल्यन

आत्मसन्मान कमी असणारा व्यक्ती स्वतःचे अवमुल्यन करतो. तो स्वतःला कमी लेखत असतो. विनोदासाठी काही लोक स्वतःवर टिका करतात. ते तेवढ्यापुरते ठिक असते. पण जर कोणी सतत स्वतःवर टिका करत असेल तर याचा अर्थ त्याच्यात आत्मसन्मान कमी आहे. विनम्रता आणि आत्मसन्मान यातला फरक ओळखायला हवा.

निर्णय क्षमता कमी

नवीन संधी, आव्हाने स्वीकारताना आत्मसन्मान कमी असणारा माणूस घाबरतो. आपल्याकडून चूक होईल या भीतीने तो निर्णय घेण्यास वेळ लावतो. कमी आत्मसन्मान हा तुमचा आत्मविश्वास कमी करतो.

Self Esteem
Personality Test : कपड्यांच्या चॉईसवरून समजतो तुमचा स्वभाव

इतरांना प्राधान्य

कमी आत्मसन्मान असणारा माणूस इतरांना खूश ठेवण्याच्या नादात स्वतःला कायम मागे ठेवतो. सगळ्यांसाठी सगळं करायच आणि स्वतःला वेळ देता येत नाही म्हणून मनात खंत करायची. असं करू नये. तुम्ही कायम सर्वांना खूश करू शकत नाहीत. स्वतःला वेळ देणं, प्राधान्य देणं आवश्यक आहे.

टिकेसाठी अतिसंवेदनशील

या व्यक्ती अतिसंवेदनशील असतात. त्यांच्यावर कोणी टिका केली तर ते फार दुखावले जातात. अतिसंवेदनशीलता ही चांगली गोष्ट नाही. स्वतःची निंदा ऐकून घेणे कोणालाच आवडत नाही. पण हे लोक ते मनाला लावून घेतात. त्यामुळे त्यांची सर्जनशीलतेवर त्याचा परिणाम होतो.

Self Esteem
Personality Development Tips: मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी फक्त 'या' सोप्या स्टेप्स करा फॉलो

सतत स्वतःची इतरांशी तुलना

जेव्हा माणूस सतत स्वतःला इतरांशी तुलना करत असतो तेव्हा तो स्वतःच्या मुल्यांशी झगडत असतो. तुलना करणे हा एक सापळा आहे. सतत इतरांशी तुलना करणे यामुळे स्वतःला दुःख करून घेणे असते. माणूस या सापळ्यात अडकतो. पण हे कमी आत्मसन्मानाचं लक्षण आहे. ज्यामुळे माणसाचा ताण वाढून आरोग्याचे प्रश्नही निर्माण होतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com