उन्हाळा बनवा ‘रिफ्रेशिंग’

जसजसा उन्हाळा जवळ येतोय, त्याच्या प्रखरतेचा आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो.
Family Health Care in Summer
Family Health Care in SummerSakal

- गौरी शिंगोटे, आर. डी., सी.ई.ओ. जुविनेट वेलबिंग

जसजसा उन्हाळा जवळ येतोय, त्याच्या प्रखरतेचा आपल्या तब्येतीवर परिणाम होऊ शकतो. विशेषतः आपण कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर किंवा वातानुकूलित ऑफिसमध्ये घालवत असल्यास, यापैकी कोणतेही कारण असो, आहाराकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामुळे आपण योग्य ती काळजी घेऊन उन्हाळ्यात निरोगी राहू शकतो.

उन्हाळ्याच्या प्रखर महिन्यांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणे आवश्यक आहे. दिवसभरात दोन ते तीन लिटर पाणी प्यायल्याने डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे, मुरूमे, केस गळणे यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. ऑफिसच्या वातानूकुलित वातावरणातील थंड व कोरड्या हवेने नकळत शरीर कोरडे होते. नियमित पाणी प्यायल्याने ही समस्या दूर होते.

पाणी पिण्यासाठी तहान लागण्याची वाट पाहणे योग्य नाही, कदाचित त्यापूर्वीच शरीर कोरडे पडले असण्याची शक्यता असते. आपल्या स्मार्टफोनवर वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून देणारे टायमर लावावे.

आहारविषयक सल्ला

समतोल आहार : उन्हाळ्यातील मोठे दिवस आणि आपल्या शरीरचक्रातील बदलांमुळे आपल्याला जास्त शक्तीची गरज असते. आहारात कर्बोदके, प्रथिने, चरबी अशा पोषणतत्त्वांचा समावेश करून कामाप्रती लागणारी शक्ती मिळवण्यासाठी उपयोग होतो. ‘योग्य प्रमाण’ ही गुरूकिल्ली आहे.

ऋतुमानाप्रमाणे हलका व थंड आहार : सॅलड्स, मोड आलेली कडधान्ये व थंड केलेली या ऋतूतील फळे यांचा योग्य पचनासाठी व उष्म्याचा सामना करण्यासाठी वापर करा. मसालेदार शिजवलेल्या पदार्थांपेक्षा कच्च्या भाज्या व मोड आलेली कडधान्ये जास्त वापरावीत. दूध व दही, ताक, चक्का यासारखे दुग्धजन्य पदार्थ यातील प्रोबायोटिकमुळे सुलभ पचनाबरोबरच शरीराला थंडावा देण्यास मदत करतात.

उन्हाळ्यातील आहार

जास्त पाणी असणारी फळे : थंडाव्यासाठी व शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड, टरबूज, द्राक्षे, आंबे, जांभळे यासारखी भरपूर अँटिऑक्सिडंट्स असणारी फळे खावीत. ही फळे स्वच्छ धुवून फ्रिजमध्ये थंड करून खाल्ल्यास शरीराला थंडावा मिळतो.

आवळा व लिंबू : क जीवनसत्त्वाने पूरेपूर भरलेला आवळा आपल्या त्वचेचे रक्षण करतो व उष्माघातापासून वाचवण्यास मदत करतो. आवळा नुसता खाल्ला जातो, त्याचे सरबत बनवले जाते आणि चटणी, लोणचे, सुपारी, कॅन्डी, मोरावळा असे तोंडीलावणे म्हणूनही तो खाल्ला जातो. लिंबूही ‘क’ जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत असून सॅलडमध्ये किंवा सरबतातून त्याचा वापर होतो.

पुदिना व कांदा : पुदिना शरीराला थंडावा देतो. उन्हाळ्यात चटणी किंवा सरबतांच्या रूपात पुदिन्याचा आस्वाद घ्या. कच्च्या कांद्यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोन्युट्रियंट्स शरीराचे तापमान समतोल राखतात व उष्माघातापासून बचाव करतात.

मका व काकडी : मका लोह व तंतुजन्य पदार्थ या पोषणतत्त्वानी समृद्ध असतो, तर काकडीत जवळजवळ ९० टक्के पाणी असल्याने हायड्रेशनसाठी उपयोग होतो.

तन-मनाचा संबंध

विचारपूर्वक खाणे : योग्य खाणे, नियमित व्यायाम व पुरेशी झोप हे आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांत या टीप्स पाळा, स्वतःला हायड्रेटेड ठेवा, पोषणतत्त्वयुक्त फळे खा, आहाराचे विचारपूर्वक नियोजन करा आणि आरोग्यदायी उन्हाळ्याचा आनंद घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com