Benefits of Jackfruit Seeds : फणसाच्या बियांचे फायदे माहित आहेत का? वजन कमी करण्यासोबतच हृदय राहील निरोगी

फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पोटॅशियममुळे हृदयाचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. तसचं या बियांच्या सेवनामुळे ब्लड प्रेशरची समस्या कमी दूर होवू शकते
फायदे फणसाच्या बियांचे
फायदे फणसाच्या बियांचेEsakal

Health Benefits : फळांचं सेवन हे आरोग्यासाठी नक्कीच फायदेशीर आहे. फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक अनेक व्हिटॅमिन आणि खनिजं तसचं फायबर मिळतात. तर काही फळांमध्ये तर त्यातील बियाचं सेवन करणं देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं. Marathi Food and Health Tips know the benefits of jackfruit seeds

काजू, बदाम, जांभुळ या फळांच्या बिया Fruit Seeds आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात त्याचप्रमाणे रसाळ अशा फणसाच्या बियांचे Jackfruit देखील आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. फणसाचं विविध प्रकारे सेवन करतात येतं. म्हणजेच अनेक ठिकाणी कच्च्या फणसाची भाजी केली जाते.

तर फणस पिकला की त्यातील रसाळ गरे खाण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. त्याच प्रमाणे फणसाच्या आठळ्या म्हणजेच बिया देखील उकडून किंवा भाजून खाण्याची एक निराळीच मजा असते. शिवाय त्या चवीला देखील चांगल्या लागतात.

फणसाच्या बियांचे आरोग्यासाठी Health देखील अनेक फायदे आहेत. फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन बी, झिंक, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम आढळतं. तसचं फणसाच्या बियांमध्ये थायमिन आणि रायबोफ्लेविन हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. या घटकांमुळे अन्नाचं उर्जेमध्ये रुपांतर होण्यास मदत होते.

फणसाच्या बियाच्या सेवनामुळे हृदयासोबत, त्वचा, केस आणि डोळ्यांच आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

पचनास मदत

फणसाच्या बियांमुळे पचनक्रिया Digestion सुधारते. ज्या व्यक्तींना पचनाच्या आणि पोटाच्या समस्या असतील अशा व्यक्तींनी आहारामध्ये फणसाच्या बियांचा समावेश करणं फायद्याचं ठरतं. फणसाच्या बियांच्या सेवनामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारण्यासही मदत होते.

हे देखिल वाचा-

फायदे फणसाच्या बियांचे
Jamun Seed Powder: जांभूळ खाऊन बिया फेकू नका; रक्तातील साखर नियंत्रणावर असा होतो उपयोग

हाडं मजबुत होतात

फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम उपलब्ध असतं. त्याचप्रमाणे या बियांमध्ये मॅग्नेशियमदेखील मुबलक प्रमणात असल्याने हाडं मजबुत होण्यास मदत होते. तसंच हाडांच्या समस्या दूर करण्यासाठी फणसाच्या बियांचा आहारात समावेश करावा.

अॅनिमियाची समस्या होते दूर

अॅनिमियाच्या रुग्णांमध्ये रक्ताची कमतरता निर्माण होते. खास करून महिलांना मासिक पाळीमुळे अनेकदा रक्ताची कमतरता निर्माण होत असते. अशावेळी फणसाच्या बियांचं सेवन उपयुक्त ठरू शकतं. फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न उपलब्ध असल्याने रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होते आणि अॅनिमियाची समस्या दूर होते.

त्वचा आणि केसांसाठी गुणकारी

फणसाच्या बियांमध्ये उपलब्ध असलेल्या व्हिटॅमिन मुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. तसंच केस चांगले होण्यासाठी देखील या बियांचं सेवन फायदेशीर ठरतं. व्हिटॅमिन ए हे डोळ्यांसाठी देखील गरजेचं असल्याने डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

वजन नियंत्रणात राहण्यास मदत

फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट उपलब्ध असतं. ज्यामुळे जेवण पचण्यास मदत होते. यामुळे शरीरामध्ये फॅट्स जमा होत नाहीत आणि शरीर फिट राहण्यास मदत होते. तसचं या बियांमधील प्रोटीनमुळे स्नायू वाढण्यास देखील मदत होते.

हृदय निरोगी राहण्यास मदत

फणसाच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या पोटॅशियममुळे हृदयाचं कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. तसचं या बियांच्या सेवनामुळे ब्लड प्रेशरची समस्या कमी दूर होवू शकते.

हे देखिल वाचा-

फायदे फणसाच्या बियांचे
Ajwain Seeds Benefits : High Cholesterol  बर्फासारखं वितळवणार हा मसाला, इतरही फायदे जाणून घ्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com