कोलेस्टोरोल नियंत्रण
कोलेस्टोरोल नियंत्रणEsakal

Blood Cholesterol कमी करण्यासाठी ५ आयुर्वेदीक औषधं

अलिकडे कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास ताप, सर्दी, खोकल्यासारखी त्याची लक्षण लगेच दिसून येत नाहीत

अलिकडे कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांना भेडसावू लागली आहे. कोलेस्ट्रॉल हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास ताप, सर्दी, खोकल्यासारखी त्याची लक्षण लगेच दिसून येत नाहीत. मात्र हृदयावर त्याचा गंभीर परिणाम होत असतो. धकाधकीचं जीवन, कामाचा वाढता ताण आणि चुकीच्या आहारामुळे ही समस्या अधिक वाढत आहे. अगदी कमी वयात ह्दयविकाराचा झटका Heath Attack आल्याचं आपण अनेकांकडून ऐकलं असेल. यासाठी कॉलेस्ट्रॉलची Blood Cholesterol वरचे वर तपासणी करणं सध्या गरजेचं आहे. Marathi Health News Lower Your Cholesterol Fast Ayurvedic Medicines to Try

कोलेस्ट्रॉल हे मेणा सारखं एक केमिकल असून शरिरातील हार्मोन्स आणि सेल बनवण्याचं काम ते करतं. हाय डेंसिटी लिपोप्रोटीन (HDL) आणि लो डेंसिटी लिपोप्रोटीन (LDL) असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रोल शरीरात असतात. या दोन्ही कोलेस्ट्रोलचं Cholesterol शरीरात संतुलन असणं महत्वाच आहे. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हे 200 mg/dL पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. हे प्रमाण वाढल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. हे संतुलन राखण्यासाठी काही आयुर्वेदीक Ayurved औषणं प्रभावी ठरू शकतात. Ayurvedic medicines to reduce bad cholesterol

जव-जव किंवा सातू ही एक भारतात प्राचीन काळापासून उगवणारं धान्य आहे. अनेक औषधी गुणधर्म असलेल्या या धान्याकडे दूर्लक्ष झालं होतं. मात्र अलिकडे बार्लीचे गुणधर्म लक्षात घेता त्याचं महत्व वाढलं आहे. आणि त्याचा आहारात समावेश केला जाऊ लागला आहे. जवमधील पोषक गुणधर्मांमुळे नसांमध्ये साचलेलं बॅड कोलेस्ट्रॉल Bad Cholesterol पातळ होवून रक्त पातळ करण्यास मदत होते. जवमध्ये कमी कॅलरीज असून फायबरचं प्रमाण जास्त असतं. यातील जीवनसत्व आणि अँटीबायोटिक्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. जव म्हणजेच बार्लीमध्ये असणारे बीटी-ग्लुकन्स LDL नियंत्रित करतात. बार्लीमुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसचं मधुमेह नियंत्रणात राहण्यासाठीदेखील बार्ली उपयुक्त आहे. 

पुनर्नवा/घेटुळी- पुनर्नवा ही वनस्पती कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गुणकारी आयुर्वेदीक पर्याय आहे. ही वनस्पती महाराष्ट्रात Maharashtra वसू किंवा खापरा नावाने देखील ओळखली जाते. ही एक वेलवर्गिय वनस्पती आहे. पुनर्नवाच्या मुळांमध्ये आईसोफ्लोवोनॉइडस् नावाचं एक कंपाउड आढळतं. जे शरीरातील अनेक समस्यांसाठी गुणकारी आहे. कोलेस्ट्रॉल वाढीसाठी तणाव हे एक मुख्य कारण आहे. एका आभ्यासानुसार पुनर्नवाच्या मुळांमध्ये अँटीस्ट्रेस आणि अँटीडिप्रेसेंट गुणधर्म आढळून येतात. यामुळेच या औषधाच्या सेवनामुळे नैराश्य दूर होण्यास मदत होते परिणामी कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यताही कमी होते. आयुर्वेदिक औषधी दुकानांमध्ये पुनर्नवाचं चुर्ण उपलब्ध असतं. या चुर्णाचं तुम्ही रात्री दूधासोबत किंवा सकाळी मधासोबत सेवन करू शकता. 

हे देखिल वाचा-

कोलेस्टोरोल नियंत्रण
या ड्रिंकच्या मदतीने Cholesterol करा नियंत्रित

आवळा-आवळा किंवा आवळा चूर्ण हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी गुणकारी असं सहज उपलब्ध होणारं आयुर्वेदिक औषध आहे. आवळा हे केवळ एक फळ नसून आयुर्वेदात त्याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. आवळ्यामध्य विटामिन सी Vitamin C Benefits मुबलक प्रमाणात उपलब्ध असून यात हे फळ म्हणजे एक प्रकारे अँटीऑक्सिडंट आणि मिनरल्सचा खजिना आहे. १०० ग्रॅम आवळ्यामध्ये जवळपास २० संत्र्यामध्ये उपलब्ध असेल इतक विटामिन सीचं प्रमाण असतं. त्याचसोबत विनामिन ए. विटामिन ई, कॅल्शियम आणि आयरनचे गुणधर्म कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अन्य आजारांवरही निराकारण करण्यास मदत करतात. कच्चा आवळा किवा आवळ्याचा रस तुम्ही पिऊ शकता. 

हे देखिल वाचा-

कोलेस्टोरोल नियंत्रण
Cholesterol Level In Male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉल लेव्हल किती असावी? जाणून घ्या एका क्लिकवर

अर्जुन वटी- अर्जुन एक झाड असून या झाडाची कालांतराने साल गळून पडते. या सालीचे अनेक औषधी उपयोग आहेत. म्हणूनच या झाडाला देवसाल असेही म्हणतात. अर्जुनाची सालीमध्ये हायपोलिपिडेमिक असल्याचे आढळून येतं, जे शरीरातील एलडीएल कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतं. या औषधाच्या सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होवून हायपरटेंशन नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्जुन सालीच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल, ट्राइग्लिसराइड आणि ब्लड प्रेशर सारख्या हृदयाशी संबंधीत सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. अर्धा लिटर पाण्यात १०० ग्रॅम अर्जुन साल उकळवून ते गाळून चहाच्या स्वरुपात सेवन केल्यास रक्तातील वाढलेल बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. तसचं हा चहा रक्तशुद्धीकरणाचं कामही करतो. 

हरिद्रा खंड- हरिद्रा ही एक प्रकारची सेंद्रिय हळद आहे. महाराष्ट्रात कोकण भागात या हळदीचं उत्पादन घेतलं जातं. या हळदीचा आयुर्वेदिक औषधं बनवण्यात वापर केला जातो. कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी हरिद्रा गुणकारी आहे. कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्या व्य़क्तीनं अर्काच्या स्वरुपात हरिद्राचं सेवन करावं. त्याचसोबत हरिद्रापासून तयार करण्यात आलेली आयुर्वेदिक औषधही बाजारात सहज उपलब्ध होतात. या हळदीत अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असून या औषधाच्या सेवनामुळे नसांमध्ये जमा झालेलं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. 

टीप- हा लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित आहे. उपचारापूर्वी आपल्या वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com