Watermelon Seeds: थांबा... कलिंगडातील बिया फेकू नका, निरोगी Heart पासून मिळतील अनेक फायदे

Watermelon Seeds Benefits: कलिंगड खात असताना आपण त्यातील बिया फेकून देतो. मात्र याच बियांमध्ये आरोग्यासाठी लाभदायक असेल अनेक गुण असतात. हृदय निरोगी ठेवण्यापासून ते चांगल्या त्वचेसाठी या बिया उपयुक्त असतात.
Watermelon Seeds Benefits
Watermelon Seeds BenefitsEsakal

Watermelon Seeds Benefits: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, यासाठीच आपण भरपूर पाणी पितं. तसचं पाण्याचं प्रमाण असलेल्या फळाचं Frutits सेवन करणं गरजेचं असत.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हायड्रेट Hydrate ठेवण्यासाठी कलिंगड हे फळ उपयुक्त आहे. Marathi Health Tips Advantages of Watermelon seeds to heart

कारण कलिंगडामध्ये Watermelon ९० टक्के पाण्याचं प्रमाण असतं. कलिंगड शरीरासाठी आवश्यक असलेलं पाणी Water पुरवण्यासोबतच यात पोटाला थंड ठेवण्याचं काम करतं. कलिंगडाच्या गराचे जसे शरीरासाठी फायदे आहेत तशाच कलिगंडाच्या बिया देखील आरोग्यासाठी Health फायदेशीर आहेत. 

कलिंगड खात असताना आपण त्यातील बिया फेकून देतो. मात्र याच बियांमध्ये आरोग्यासाठी लाभदायक असेल अनेक गुण असतात. हृदय निरोगी ठेवण्यापासून ते चांगल्या त्वचेसाठी या बिया उपयुक्त असतात. पाहुयात कलिंगडाच्या बियांचे काही महत्वपूर्ण फायदे. Watermelon seeds Benefits 

निरोगी हृदयासाठी- रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कलिंगडाच्या बिया फायदेशीर ठरतात. या बियांमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. या बियांमधील अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे हृदय निरोगी राहतं.

त्याचसोबत दृदयाच कॅल्शियम रेग्युलेट करण्यासाठी मदत होते. विविध गुणधर्म हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळेच निरोगी हृदयासाठी कलिंगडाच्या बियांचं सेवन महत्वाचं आहे. 

हाडं मजबूत करण्यासाठी-  कलिंगडाच्या बियांमध्ये कॉपर, मॅग्नेशिय आणि पोटॅशियम सारखी खनिजं मुबलक प्रमाणात आढळतात. ही खनिजं इतर पोषक घटकांसोहत एकत्र येऊन हाडं मजूबूत करण्याचं कार्य करतात.

कलिगंडच्या बिया आपली हाडं मजबूत करण्यासोबतच हाडांची घनता वाढवण्यासाठी फायदेशीर आहेत. Watermelon seeds for healthy bones 

हे देखिल वाचा-

Watermelon Seeds Benefits
Watermelon : अय्यो! चक्क साडे चार लाखांचं एक कलिंगड; खावं की तिजोरीत ठेवावं?

चयापचय क्रिया सुधारते- कलिंगडच्या बिया म्हणजे एका प्रकारे फॉलेट, आयरन, कॉपर, झिंक तसचं मॅग्नेशियम आणि पोटॅशियम या खनिजांचा पावर हाउस आहेत.

या बिया अमीनो ऍसीड, प्रोटीन आणि विटामिन बी कॉम्लेक्लने समृद्ध असल्यानेच त्या शरीरासाठी पौष्टिक मानल्या जातात. या बियांमधील हे सर्व पोषक घटक शरीराची चयापचय क्रिया जलद करण्यास मदत करतात.

मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर- कलिंगडाच्या बिया मधुमेह नियंत्रणात राखण्यासही मदत करू शकतात. रक्तातील वाढलेल्या साखरेची पातळी कमी करून ब्लड शुगर नियंत्रणाच आणण्याचं काम या बिया करतात. त्यामुळे मधूमेही रुग्णांसाठी या बिया उपयुक्त आहेत.

चमकदार त्वचा- कलिंगडाच्या बियांमध्ये असलेल्या फॅटी ऍसिडमुळे त्वचा ड्राय होत नाही. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते आणि त्वचेचं नुकसान होण्यापासून मदत होते. एका अभ्यासानुसार या बियांमध्ये असलेल्या विटामीन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेसंबधी अनेक समस्या दूर होवू शकतात. Glowing skin

या बियांमुळे चेहरा तरुण दिसण्यास मदत होते. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असल्याने चेहऱ्यावरील डाग कमी होतात आणि चेहरा ग्लो करू लागतो. तसचं निस्तेज आणि रुक्ष त्वचेला माॅइस्चराईज करण्याचं काम या बिया करतात.

एनर्जी वाढण्यास मदत- कलिंगडाच्या बियांमध्ये असलेल्या मायक्रोन्यूट्रिएंट्समुळे एनर्जी लेवल बूस्ट होण्यास मदत होते. वाढत्या उन्हाळ्यात तुम्ही कलिंगडासोबतच जर बियांचं देखील सेवन केलं तर तुम्हाला एनर्जी टिकवून ठेवण्यास तसचं हायड्रेट राहण्यास मदत होईल.

स्पर्म काउंट वाढवण्यास मदत- कलिंगडाच्या बियांमध्ये आढळणारं झिंक पुरुषांची प्रजनन शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. यातील झिंकमुळे स्पर्म काऊंट वाढण्यास मदत होते ज्यामुळे पुरुषांमधील फर्टिलीटी वाढते. Watermelon seeds for male fertility 

हे देखिल वाचा-

Watermelon Seeds Benefits
Watermelon Face Pack : कलिंगड फक्त खाऊ नका तर चेहऱ्यालाही लावा; कारण जाणून घ्या

कसं करावं कलिंगडच्या बियांचं सेवन

  • कलिंगड्या बिया धूवून त्या वाळवाव्यात. त्यानंतर त्या सोलून कच्च्या खाव्या.

  • या बियांचा स्वाद वाढवण्यासाठी तुम्ही मंद आचेवर त्या भाजूनही खावू शकता.

  • कलिंगड्या बियांना मोड आणून त्या खाल्ल्यास त्यातील पोषक तत्व अधिक वाढतात.

  • जर तुम्ही कलिंगडचा ज्यूस बनवून पित असाल तर त्यातील बिया काढू नये. बियांसह ज्यूस बनवावा यामुळे बियांमधील पोषक तत्वदेखील तुमच्या शरीराला मिळतील. 

अशा प्रकारे कलिंगड खात असताना त्यातील बिया फेकून देण्याएवजी तुम्ही त्याचं वेगवेगळ्या प्रकारे सेवन करून आरोग्याला फायदा करून घेऊ शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com