Soar Eyes डोळ्यात धूळ आणि घाण गेल्याने होतेय जळजळ, असे स्वच्छ करा डोळे

अनेकदा डोळ्यात जाणारे काही कण हे प्रदूषित धूळीचे Pollution किंवा केमिकल असलेल्या घटकांचे असू शकतात. यामुळे डोळ्यांच्या Eyes नाजूक पेशींना किंवा नसांना इजा होवू शकते
डोळे ठेवा स्वच्छ
डोळे ठेवा स्वच्छEsakal
Updated on

सध्या जिथे पहावं तिथे धुळीचं Dust साम्राज्य पसरलंय. अशात अनेकदा रस्त्यावरून जाताना किंवा प्रवास करताना वाऱ्यामुळे अचानक डोळ्यात धूळ किंवा घाण जाते. अशा वेळी डोळे चुरचुरतात Eyes . Marathi Health Tips How to Clean soar eyes

डोळ्यात Eyes धूळ गेल्यानंतर डोळे धूळ किंवा घाणीचे कणं बाहेर पडावे म्हणून नैसर्गिकरित्या अश्रू सोडतात. मात्र यानंतरही अनेकदा बराचवेळ डोळ्यांची जळजळ होत राहते. अनेकदा डोळ्यात जाणारे काही कण हे प्रदूषित धूळीचे Pollution किंवा केमिकल असलेल्या घटकांचे असू शकतात.

यामुळे डोळ्यांच्या Eyes नाजूक पेशींना किंवा नसांना इजा होवू शकते. तसंच होळी किंवा गणपतीच्या काळात डोळ्यात रंग किंवा गुलाल गेल्याने देखील डोळ्यांचं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच डोळ्यात धूळीचे कण गेल्यास ते स्वच्छ करणं गरजेचं आहे.

असे स्वच्छ करा डोळे

डोळ्यात धुळीचे कण, रंग किंवा गुलाल गेल्यास स्वच्छ पाण्याने डोळे धुवाने. यासाठी –

सर्वप्रथम हात स्वच्छ धुवा. त्यानंतर हाताच्या ओंजळीत स्वच्छ पाणी घेऊन त्यात डोळा बुडवा. असा दोन तीनदा करा यामुळे डोळ्यातील धुळेचे किंवा घाणीचे कणं बाहेर निघण्यास मदत होईल.

त्याच सोबत वाहत्या पाण्याने तुम्ही ५ मिनिटांसाठी डोळा धुवू शकता. लक्षात घ्या पाण्याचा मोठा फटकारा डोळ्यावर मारू नका.

हे देखिल वाचा-

डोळे ठेवा स्वच्छ
Eye Care : पालकांच्या या चुकांमुळे लहान वयातच मुलांना लागतोय चश्मा

याशिवाय डोळे धुवूनही डोळ्यातील कण निघाले आहेत की नाही तुमच्या लक्षात येत नसेल मात्र डोळ्यांची जळजळ होत असेल तर डोळे बंद करून डोळ्यांवर एखादा रुमाल किंवा एखादं कापड टाकून थोडा वेळ विश्रांती घ्या यामुळे डोळ्यांना आराम मिळेल शिवाय. काही वेळेस धूळ किंवा घाण डोळ्यांच्या कडेवर जमा होईल आणि ती काढून टाकणं सोप होईल.

एखादं सुती कापड पाण्यामध्ये ओलं करून हे कापड डोळ्याच्या कडेने हलकं दाब देऊन डोळे पुसा. लक्षात घ्या केवळ हलक्या हाताने डोळा पुसावा डोळा चोळू नये.

डोळे स्वच्छ करताना घ्यायची काळजी

डोळा हा अत्यंत नाजूक अवयवय आहे. त्यामुळे डोळे स्वच्छ करताना काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. डोळ्यात कचरा किंवा एखादे कण गेल्यास कोणती सावधानगिरी बाळगावी ते पाहुयात.

डोळ्यात घाण गेल्यावर लगेचच डोळे चोळू नका.

डोळ्या धुण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

जर तुम्ही लेन्स वापरत असाल तर डोळे धुण्यापूर्वी त्या काढा.

डोळे धुतल्यानंतर जर डोळ्याची जळजळ होत असेल तर हलक्या थंड किंवा गरम पाण्याची शेक तुम्ही देऊ शकता.

तसंच मेडिकलमध्ये मिळणाऱ्या टियर ड्रॉप किंवा इतर आयड्रॉपच्या मदतीनेही तुम्ही डोळे स्वच्छ करू शकता.

जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com