Brain booster foods: कम्प्यूटरपेक्षा फास्ट चालेल मेंदू, ‘या’ पदार्थांच्या सेवनाने वाढवा मेंदूची ताकद

शरीराप्रमाणे मेंदूच्या आरोग्याकडे सहसा कुणी लक्ष देताना दिसत नाही. मात्र मेंदूमुळेच शरीराचं कार्य योग्य रित्या चालत असतं. मेंदूकडून मिळालेल्या सूचनांचं पालन अवयव करत असतात. त्यामुळे मेंदू निरोगी आणि हेल्दी राहिलं तर तुमचं शरीरही निरोगी राहण्यास मदत होईल
वाढवा मेंदूची ताकद
वाढवा मेंदूची ताकदEsakal
Updated on

शरीराचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सर्वजण काळजी घेतो. पोषक आहार घेण्याकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे मेंदूच्या आरोग्याची Brain Health काळजी घेणं देखील अत्यंत गरजेचं आहे. शरीराची ताकद किंवा क्षमता वाढवण्यासाठी सकस आहार गरजेचा आहे. Marathi Health Tips Increase your Brain power and memory by diet

ज्याचप्रमाणे जर काही पदार्थांच्या सेवनामुळे मेंदूची ताकद Brain Power आणि क्षमता वाढवणं देखील शक्य आहे. मेंदूची ताकद वाढल्याने तुमची स्मरणशक्ती Memory चांगली होईल. तसंच अनेक मानसिक आजारांचा धोका दूर होईल.

शरीराप्रमाणे मेंदूच्या आरोग्याकडे सहसा कुणी लक्ष देताना दिसत नाही. मात्र मेंदूमुळेच शरीराचं कार्य योग्य रित्या चालत असतं. मेंदूकडून मिळालेल्या सूचनांच पालन अवयव करत असतात. त्यामुळे मेंदू निरोगी आणि हेल्दी राहिलं तर तुमचं शरीरही निरोगी राहण्यास मदत होईल.

तज्ज्ञांच्या मते मेंदूच्या कार्यासाठी मोठी उर्जा गरजेची असते. ही उर्जा तुमच्या रोजच्या आहारातून मेंदूला मिळेलचं असं नाही. मेंदूला लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याच्या चांगल्या स्मरणशक्तीसाठी काही खास पदार्थांचं सेवन करणं गरजेचं आहे. या पदार्थांचा फायदा थेट तुमच्या मेंदूला होवू शकतो. रोजच्या आहारामध्ये या पदार्थांचा समावेश केल्याच मेंदूची ताकद बूस्ट होण्यासाठी मदत होईल.

वाढवा मेंदूची ताकद
Memory Tips : विसरभोळेपणावर करा मात; अशी वाढवा स्मरणशक्ती

मेंदूची ताकद वाढवण्यासाठी करा या पदार्थांचं सेवन

१. हिरव्या पालेभाज्या- हिरव्या पालेभाज्या या ज्याप्रमाणे शरीरासाठी फायदेशीर आहेत त्याचप्रमाणे मेंदूची ताकद वाढवण्यासाठी देखील हिरव्या पालेभाज्यांचं सेवन फायदेशीर ठरू शकतं. पालक, कोबी, फुलकोबी अशा भाज्यांमध्ये मेदूंची ताकद वाढवणारे बीटा-कॅरोटीन, फॉलिक ऍसिड, ल्यूटीन आणि विटामिन्ससह अनेक पोषक तत्व आढळतात.

एका अभ्यासानुसार प्लांट बेस्ट प्रोडक्ट मेंदूची ताकद बूस्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

२. सुकामेवा- मेंदूची ताकद बूस्ट करण्यासाठी बदाम, अक्रोड आणि पिस्ता अशा नट्सचा आहारामध्ये समावेश करावा. यातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडसह अनेक इतर पोषक तत्व हे मेंदूसाठी गरजेची आहेत.

खास करून रात्री भिजवलेले बदाम आणि अक्रोड मेंदूची ताकद वाढवून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात.

३. व्हिटॅमिन सी असलेली फळं- शारिरीक आणि मानिसक आरोग्य चांगलं राखण्यासाठी आहारात फळांचा समावेश गरजेचा आहे. खास करून व्हिटॅमिन सी असलेल्या फळांच्या सेवनामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते. व्हिटॅमिन सीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे उतार वयात किंवा वृद्धापकाळात कोणाऱ्या स्मरणशक्तीशी निगडीत समस्या कमी होतात.

व्हिटॅमिन सी असलेल्या फळांचं सेवन केल्यास नैराश्य, चिंता आणि स्किझोफ्रेनिया यांसारखे मानसिक विकार होण्याची शक्यता कमी होते. संत्री, किवी, पेरू यांसारख्या फळांच्या सेवनाने स्मरणशक्ती चांगली होण्यास मदत होते.

४. ब्रोकोली- ब्रोकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. तसंच यात व्हिटॅमिन के देखील मुबलक प्रमाणात आढळतं. व्हिटॅमिन के मुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळेच आहारामध्ये ब्रोकोलीचा समावेश केल्यास मेंदूची क्षमता बूस्ट होण्यास मदत होईल.

५. टोमॅटो- मेंदूची ताकद वाढवण्यासाठी टोमॅटो हा एक उत्तम स्त्रोत आहे. टोमॅटोमध्ये आढळणाऱ्या लायकोपीन या घटकातील गुणधर्मामुळे अल्झायमर आणि पार्किसंस यांसारखे स्मरणशक्तीचे आजार दूर होण्यास मदत होते. एका मध्यम आकाराच्या टोमॅटोमध्ये ३.२ मिलिग्रॅम लायकोपीन आढळतं.

यासाठीच आहारामध्ये टोमॅटोचा समावेश असणं आवश्यक आहे. तुम्ही टोमॅटो सूप किंवा टोमॅटो चटणीचा आहारामध्ये समावेश करू शकता.

वाढवा मेंदूची ताकद
Memory Tips : तुमच्या मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही? ट्राय करा 'या' टिप्स

६. रावस आणि टुना मासा- रावस आणि कुपा मासा यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळतं. यामुळे मेंदूची ताकद वाढण्यास मदत होते. या माश्यांमध्ये आढळणाऱ्या हेल्दी फॅट्समुळे रक्तातील बीटा-एमिलॉइड कमी करण्यास मदत होते.

बीटा- एमिलॉइड मेंदूमध्ये हानिकारक प्रोटीन तयार करत. याचा मेंदूच्या कार्यावर परिणाम होवून भविष्यात अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. हा धोका टाळण्यासाठी आहारामध्ये रावस आणि कुपा मासा यांचा समावेश फायदेशीर ठरू शकतो.

७. चॉकलेट- स्मरणशक्ती वाढवण्यासाठी डार्क चॉकलेट देखील फायदेशीर ठरतं. चॉकलेटमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि कॅफेन सारख्या नैसर्गिक उत्तेजकांमुळे स्मरणशक्ती वाढून लक्ष केंद्रीत होण्यास मदत होते. शिवाय तुमचा मूडही चांगला होतो..

डार्क चॉकलेटमधील फ्लेव्होनॉइड्समुळे एखादी गोष्ट लवकर आत्मसात करण्यास मदत होते तसंच स्मरणशक्ती वाढते.

यासोबतच आहारमध्ये दूध, अंड, बेरीज या पदार्थांचा समावेश केल्याने देखील मेंदूची ताकद वाढवण्यास मदत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com