Memory Tips : तुमच्या मुलांच्या काहीच लक्षात राहत नाही? ट्राय करा 'या' टिप्स

मुलाच्या काहीच लक्षात राहत नाही, अशी तक्रार अनेक पालकांची असते. सोप्या उपायांनी मुलांची स्मरणशक्ती वाढवता येऊ शकते.
Memory Tips
Memory Tipsesakal
Updated on

हायलाइट्स

  • लहान मुले असतात चौकस

  • स्मरणशक्ती वाढवण्याठी भरपूर झोपेची गरज

  • मुलांना जग दाखवण्याने होतात हुशार

Memory Tips
Health Tips: पाठदुखीने हैराण आहात? ट्राय करा ३ सोपे उपाय

To Boost Memory : लहान मुलांची आकलन क्षमता आणि स्मरणशक्ती ही मोठ्या माणसांपेक्षा अधिक असते. प्रत्येक गोष्टीचे कुतूहल असते. आपल्या आजूबाजूला घडणारी प्रत्येक बारीकसारिक गोष्ट मुलांना जाणून घेण्याची इच्छा असते आणि त्यासाठी ते सतत इतरांना प्रश्न विचारत असतात. मात्र काही मुलांना अनेकदा समजावून सांगूनही त्यांच्या लक्षात राहत नसल्याचा अनुभव पालकांना येत असतो.

Memory Tips
Health : 'या' गोष्टींसोबत दूध प्या; वजन वाढण्यास मदत होईल

विशेषतः अभ्यासाच्या बाबतीत आपल्या मुलांच्या काहीच लक्षात राहत नसल्याची अनेक पालकांची तक्रार असते. आपल्या मुलांची स्मरणशक्ती कमी असल्यामुळे इतरांच्या तुलनेत ती स्पर्धेत मागे राहतील की काय, अशी भितीही त्यांना वाटत असते. काही सोप्या उपायांनी तुम्ही मुलांची स्मरणशक्ती सुधारू शकता. जाणून घेऊया, टिप्स.

Memory Tips
Health Tips : वजन कमी करण्यासाठी गरम पाणी किती प्यावे? जाणून घ्या

पुरेशी झोप

मुलांच्या स्मरणशक्तीचा सर्वाधिक संबंध हा त्यांच्या झोपेशी असतो. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मुलांची विचार करण्याची, लक्षात ठेवण्याची आणि समजून घेण्याची क्षमता ही झोपेतच विकसित होत असते. अनेकदा घरातील मोठी माणसं उशिरा झोपतात. त्यामुळे लहान मुलंही लवकर झोपत नाहीत. शिवाय सकाळची शाळा असेल तर त्यांना लवकर उठवलं जातं. मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांना जास्त झोपेची गरज असते. ही गरज लक्षात घेऊन मुलांच्या झोपेचं नियोजन करणं आवश्यक आहे.

Memory Tips
Health Tips : तंदुरुस्त, निरोगी राहण्यासाठी सोप्या टिप्स; आजार राहतील दूर...

पोषक व चौकस आहार

मुलांच्या मेंदूचा विकास करण्यासाठी पोषक आहार मिळणं गरजेचं आहे. सर्व प्रकारची व्हिटॅमिन्स मुलांना मिळणं आणि प्रोटिन, फायबरयुक्त आहार दररोज खाणं आवश्यक आहे.

Memory Tips
Health Tips : तुमच्याही हाताच्या नसा दिसतात?; जाणून घ्या कारणे..

बुद्धीचे खेळ

मुलांसोबत बुद्धी वापरावी लागेल, असे खेळ खेळा. बाजारात मिळणारे आणि पारंपरिकरित्या खेळले जाणारे अनेक मेमरी गेम यासाठी फायद्याचे ठरतात. या खेळांमध्ये मुलांच्या तर्कशक्तीचा चालना मिळते आणि खेळाची मजादेखील लुटता येते. सुडोकू, शब्दकोडी किंवा बोली कोडी घालणे यासारख्या खेळांमुळे मुलांच्या बुद्धीमत्तेची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते.

Memory Tips
Health : दिल का कनेक्शन है दिमाग से! संशोधनातून झाले सिध्द

जनरल नॉलेज

मुलांची बुद्धीमत्ता कुशाग्र व्हावी, यासाठी त्यांना वारंवार घराबाहेर नेणे आणि बाहेरचं जग दाखवणे गरजेचं आहे. यामुळे नवनव्या गोष्टींशी मुलांचा संपर्क येतो आणि त्यांची बुद्धी कुशाग्र बनते. शिवाय मुलांचे जनरल नॉलेज वाढेल अशा गोष्टी सांगाव्या, वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधावा. काही गोष्टी जेव्हा मुलं प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहतात आणि अनुभवतात, तेव्हा त्या गोष्टी दीर्घकाळ त्यांच्या लक्षात राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com