Quit Smoking - सिगारेट सोडल्यानंतर काही मिनिटांमध्ये शरीरात होतात चांगले बदल, मग आजच बंद करा धुम्रपान

benefits of quitting smoking: डॉक्टरांच्या मते सिगारेट सोडल्यानंतर केवळ १५ मिनिटांच्या आताच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक बदल घडणं सुरू होतं. तर एखाद्या व्यक्तीने संपूर्णपणे सिगारेट सोडल्याच्या १५ वर्षांनंतर ती इतर हेल्दी व्यक्तीप्रमाणेच हेल्दी होते
benefits of quitting smoking
benefits of quitting smokingEsakal

Benefits of Quitting Smoking: सिगारेट हे एक असं व्यसन आहे ज्यामुळे शरीर आतून एक प्रकारे पोखरलं जातं असतं. हे एक असं व्यसन आहे ज्यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य Health धोक्यात येतचं शिवाय धूम्रपान करत असताना ती व्यक्ती इतरांची जीव धोक्यात टाकत असते. Marathi Health Tips why it is important to quit smoking

अनेकजण सुरुवातीला फॅशन किंवा स्टाइल स्टेटमेंट म्हणून सिगारेट Cigarate ओढणं सुरू करतात. मात्र कालांतराने ही सवय एक व्यसन बनून जाते जे सोडणं अत्यंत कठिण ठरतं.  सिगारेटचं व्यसन Smoking Habit जडल्यानंतर ते सोडण्यासाठी अनेकजण प्रयत्न देखील करतात.मात्र यात सगळ्यांना यश मिळतं नाही.

शिवाय सिगारेट सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये शरीरात असे काही बदल घडू लागतात ज्यामुळे ती व्यक्ती पुन्हा काही दिवसातच सिगारेट ओढणं पुन्हा सुरू करते.

अभ्यासानुसार प्रत्येकी ३ धूम्रपान कऱणाऱ्या व्यक्तीपैकी एक व्यक्ती सिगारेट सोडू इच्छिते. यातील ५० टक्के लोक प्रयत्नदेखील करतात. मात्र केवळ तीन ते सहा टक्के लोकांना धूम्रपान सोडण्यात यश येत. 

डॉक्टरांच्या मते सिगारेट सोडल्यानंतर केवळ १५ मिनिटांच्या आताच व्यक्तीच्या शरीरात सकारात्मक बदल घडणं सुरू होतं. तर एखाद्या व्यक्तीने संपूर्णपणे सिगारेट सोडल्याच्या १५ वर्षांनंतर ती इतर हेल्दी व्यक्तीप्रमाणेच हेल्दी होते. 

हे देखिल वाचा-

benefits of quitting smoking
Smoking Habit: धूम्रपान काही केल्या सोडवत नाहीये ? हे उपाय करून पाहा...

सिगारेट सोडचाना येतात या अडचणी

जर एखाद्या व्यक्तीला अनेक वर्षांपासून सिगारेट ओढण्याची सवय असेल. तर हे व्यसन सोडताना त्याला काही शारीरक आणि मानसिक समस्यांचा समाना करावा लागू शकतो. अनेकदा या समस्या सिगारेट सोडण्याच्या केलेल्या संकल्पापासून व्यक्तीला पुन्हा भरकटवू शकता.

सिगारेट सोडल्यानंतर काही दिवस झोप Sleep न येणं, चिडचिड होणं आणि अनावश्यक राग येणं, कामाच लक्ष केंद्रित करण्यास अडचण येणं, भूक न लागणं, हृदयाचे ठोके वाढणं, कासाविस होणं अशा अनेक गोष्टी घडू शकतात.

यामुळे पुन्हा एखादी सिगारेट ओढण्याची इच्छा होते. मात्र यासाठी तुम्ही डॉक्टरांची मदत घेऊ शकता. यातील काही समस्या कमी करण्यासाठी डॉक्टर तुम्हाला औषधं देतील. तसचं तुमचं समुपदोशन करतील. यामुळे तुम्हाला व्यसन सोडणं सोप होईल. 

सिगारेट बंद केल्यानंतर तुम्हाला जरी थोडा शारीरक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असला तरी हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की सिगारेट बंद केल्यानंतर अगदी काही मिनिटांमध्येच शरीरात चांगले बदल घडू लागतात. हे बदल कोणते आहेत ते जाणून घेतल्यानंतर तुम्ही नक्कीच हे व्यसन सोडाल.

सिगारेट बंद केल्यानंतर शरीरात होणारे बदल

  • सिगारेट किंवा तंबाखू सोडल्यानंतर म्हणजेच हे व्यसन सोडल्यानंतर २० मिनिटातच ब्लड प्रेशर नॉर्मल होतं.

  • तसंच ८ तासांनतर शरीरामध्य कार्बन मोनोऑक्साइडचं प्रमाण निम्म कमी होतं. 

  • तीन दिवसांमध्येच श्वास घेण्याची क्षमता अधिक चांगली होते.

  • सिगरेट सोडल्यानंतर २ महिन्यांनी हृदय आणि फुफ्फुसाचं कार्य अधिक चांगलं काम करू लागतं. 

  • एक वर्षानंतर हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. 

  • पाच वर्षांनंतर स्ट्रोक किंवा लकवा याचा धोका एखाद्या सामान्य व्यक्तीइतका कमी होतो. 

  • १० वर्षांनंतर लंग कॅन्सरचा धोका देखील कमी होतो. 

  • तर सिगरेट सोडल्याच्या १५ वर्षांनंतर त्या व्यक्तीचं शरीर हे एखाद्या निर्व्यसनी व्यक्तीसारखं आरोग्यदायी होतं. 

यासाठीच वेळीच सिगरेटचं व्यसन सोडल्यास भविष्यात उद्भवणारे धोके कमी होवून एक आरोग्यदायी आयुष्य जगता येऊ शकतं. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com