Pregnancy ची लक्षणं दिसताहेत, मात्र टेस्ट निगेटिव्ह येतेय? मग कसं ओळखाल तुम्ही गरोदर आहात की नाही?

अनेकदा प्रेग्नेंसीची लक्षणं आढळूनही होम प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचा अनुभव अनेक महिलांना येतो. याला फॉल्स निगेटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट असं म्हणतात. यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात
how to check pregnancy at home without kit
how to check pregnancy at home without kitEsakal

How to check pregnancy: महिलांमध्ये मासिक पाळी चुकली की सर्वप्रथम डोक्यात विचार येतो तो म्हणजे आपण गरोदर तर नाही ना? मासिक पाळी चुकण्याशिवाय गरोदरपणाची इतरही काही लक्षणं आहेत. यामध्ये सकाळी अशक्तपणा जाणवणं, थकवा, चक्कर, मळमळ काही वेळेस स्पॉटिंग अशी काही गरोदरपणाची साधारण लक्षणं आहेत.

अनेकदा ही लक्षण दिसू लागल्यानंतर एखादी महिला घरी प्रेग्नेंसी टेस्ट किट Pregnancy Kit आणून ते तपासते. अशा वेळी बऱ्याचदा गरोदरपणाची लक्षणं असूनही टेस्ट मात्र निगेटिव्ह येते आणि मग गोंधळ उडतो. How To Check Pregnancy Test Accuracy

अनेकदा खरोखरच गरोदर Pregnant असल्याने ही लक्षणं दिसत असतात. मात्र तरीही प्रेग्नेंसी टेस्ट Test निगेटिव्ह येते. तर काही वेळेस गरोदर नसतानाही अशी लक्षणं दिसू शकता.

अर्थात प्रेग्नेंट नसल्याने टेस्ट निगेटिव्ह येते. मग अशा वेळी आपण गरोदर आहोत की नाही आणि जर आहोत तर टेस्ट निगेटिव्ह का येते असे अनेक प्रश्न तुम्हाला पडू शकता. असं का होतं यामागची काही कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

फ्लॉल्स प्रेग्नेंसी

अनेकदा प्रेग्नेंसीची लक्षणं आढळूनही होम प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह येत असल्याचा अनुभव अनेक महिलांना येतो. याला फॉल्स निगेटिव्ह प्रेग्नेंसी टेस्ट असं म्हणतात. यासाठी अनेक कारणं जबाबदार असतात. यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे खूप लवकर टेस्ट करणं. 

जर तुम्ही प्रेग्नेंसीसाठी ट्राय करत असाल आणि तुम्हाला प्रेग्नेंसीची लक्षणंही दिसत असतील तर अनेकदा खूप आधी प्रेग्नेंसी टेस्ट केल्याने ती निगेटिव्ह येऊ शकते.

जेव्हा एखादी स्त्री गरोदर राहते तेव्हा तिच्या शरीरात HCG हार्मोन्स प्रमाण वाढतं. जेव्हा तुम्ही गरोदर राहता तेव्हा फर्टिलाइज एग इंप्लांट होतं म्हणजेच फलित अंड गर्भाशयाच्या पिशवीला चिकटतं तेव्हा प्लेसेंटाकडून या हार्मोन्सची निर्मिती होते. 

हे देखिल वाचा-

how to check pregnancy at home without kit
Pregnancy Tips : तिशीनंतर गर्भधारणेत येतात या अडचणी

एग इंप्लांटेशनच्या काही दिवसांनंतर लघवीतून या हार्मोन्सची चाचणी करणं शक्य असतं. मात्र ते योग्य प्रमाणात तयार होण्यासाठी काही दिवस लागू शकतात. अशात तुम्ही लगेचच किट आणून टेस्ट केल्यास ती निगेटिव्ह येऊ शकते. 

तसचं चुकीच्या पद्धतीने प्रेग्नेंसी टेस्ट केल्यासही ती निगेटिव्ह येण्याची शक्यता असते. यासाठी प्रेग्नेंसी टेस्ट किटवर लिहिलेल्या सर्व सुचना वाचून त्याप्रमाणेच टेस्ट करणं गरजेचं आहे. टेस्टचा रिझल्ट योग्य यावा यासाठी सकाळची पहिली लघवी वापरणं योग्य ठरतं. 

गरोदरपणासारखीच इतर आजारांची लक्षण

अनेकदा प्रेग्नेंसीची वाटणारी लक्षणं ही गरोदरपणाची नसून ती इतर आजारांची असतात. त्यामुळे अशा वेळी तुमची प्रेग्नेंसी टेस्ट निगेटिव्ह येणं हे साहजिक आहे.

काही इतर आजारांमध्येही गरोदरपणाशी मिळती जुळती लक्षण दिसून येतात. यात प्रीमेंस्ट्रुअल सिंड्रोम, ओवेरियन सिस्ट, थायराइडची समस्या तसचं ताण यामुळे गरोदरपणातील लक्षण अनुभवायाल येतात. 

तसचं काही औषधं जसं की डिप्रेशनचं औषधं आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या सेवनाने देखील गरोदरपणासारखी लक्षणं दिसणं सामान्य बाब आहे. 

हे देखिल वाचा-

how to check pregnancy at home without kit
Post Pregnancy Yoga : प्रसुतीनंतर वाढलेल्या पोटाकडे बघत राहून काही होणार नाही; ही योगासने करा फरक अनुभवा!  

मासिक पाळीतील अनियमिततापणा

जर तुम्हाला नियमित किंवा वेळेवर मासिक पाळी येत नसेल तरिही तुम्हाला गरोदरपणाची लक्षणं जाणवू शकतात.

त्याचप्रमाणे अनेकदा काही महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्याचं सेवन करतात. याचा परिणाम म्हणून मळमळ किंवा पुढील पाळीची तारीख निघून जाणं, चक्कर येणं अशी गरोदरपणाची लक्षण जाणवू शकताता. अशावेळी तुमची टेस्ट मात्र निगेटिव्ह येते. 

डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य

गरोदरपणाची लक्षण दिसून येत असतील मात्र टेस्ट निगेटिव्ह येत असेल तर काही दिवस थांबून पुन्हा टेस्ट करावी.

शिवाय तुम्ही गरोदर आहात कि नाही याची खात्री करून घेण्यासाठी तुम्ही डॉक्टरांना नक्की भेट द्या. रक्ताची चाचणी किंवा सोनोग्राफीच्या मदतीने अचून प्रेग्नन्सी टेस्ट करणं शक्य होतं. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com