Maternity Leave वर जाण्याआधी टेन्शन आलंय? या 5 गोष्टी जाणून घ्या अन् व्हा निश्चिंत

कामाला जाणाऱ्या महिलांना गर्भावस्थेत आराम मिळावा म्हणून मॅटर्निटी लिव्हची सोय करण्यात आली आहे.
Maternity Leave
Maternity Leaveesakal

Important 5 Things Before Maternity Leave : गर्भावस्थेत महिलेने भरपूर आराम करावा जेणे करून बाळ जन्माला घालताना काही समस्या निर्माण होऊ नये असे मानले जाते. पण जॉब करणाऱ्या महिलांना हा आराम मिळावा म्हणून मॅटर्निटी लिव्हची सोय करण्यात आली आहे.

याकाळात महिलांना फक्त आपल्या डाएटची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पण प्रत्यक्षात पुरेसा आराम मिळणेपण आवश्यक असते. पण जॉब करणाऱ्या महिलांना असा आराम मिळणे कठीण होते. म्हणूनच प्रेग्नंसीच्या शेवटच्या तीन महिन्यांत मॅटर्निटी लिव्हची सोय करण्यात आली आहे.

आजवर मॅटर्निटी लिव्हमध्ये महिलांना १२ आठवड्यांची सुट्टी देण्यात येत होती. पण आता ती २६ आठवड्यांची करण्यात आली आहे. ही सुट्टी प्रसुतीनंतर आराम आणि बाळाच्या संगोपनासाठी दिली जाते. याकाळात महिलेला आपली व बाळाची काळजी घेऊन रिकव्हर झाल्यावर कामावर परतण्याची सुविधा मिळते.

त्यामुळे जर तुम्ही गरोदर असाल आणि मॅटर्निटी लिव्ह घेणार असाल तर त्याआधी या ५ गोष्टींची माहिती करून घ्या.

Maternity Leave
Maternity Leave : बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी रजा घेणे महिलेचा अधिकार; हाय कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

तुमच्या ऑफीसची एच आर पॉलिसी

  • कंपनीकडून मॅटर्निटी लिव्ह किती दिवसांची आहे, त्यात काही सबक्लॉझेस तर नाहीत ना हे जाणून घेणं गरजेच असतं.

  • यात तुमच्या वर्क प्रोफाइलनुसार काही अजून पर्याय उपलब्ध होऊ शकतात. उदा. वर्क फ्रॉम होमची सुविधा शेवटच्या तीन महिन्यात मिळू शकते.

  • अशा गोष्टी एच. आर. शी बोलून स्पष्ट करून घ्याव्या.

Maternity Leave
Maternity Bag Packing Tips : प्रसुतीसाठी हॉस्पीटलमध्ये जाताना बॅगेत काय काय ठेवाल ?

मॅनेजरशी वेळीच बोलून घ्यावे

बऱ्याचदा गरोदरपणाचे पहिले तीन महिने ही बातमी कोणालाही न सांगण्याची पद्धत आहे. पण त्यानंतर मात्र तुम्ही तुमच्या मॅनेजरशी वेळीच बोलणे आवश्यक आहे. कारण चौथ्या महिन्यापासून पोट दिसायला सुरुवात होते आणि आरामाची गरज वाढते.

अशावेळी वेळेत सवलत, वर्क फ्रॉम होमची सवलत हवी असल्यास मॅनेजरचे सहकार्य मिळू शकते.

Maternity Leave
Maternity Leave नंतर पाकिस्तानची खेळाडू वर्ल्ड कपसाठी सज्ज

सुट्ट्या सांभाळून वापरा

तुम्हाला मिळालेल्या प्रिव्हीलेज लिव्हला मॅटर्निटी लिव्हशी जोडू नका. आधीच २६ आठवड्यांची मॅटर्निटी लिव्ह घेतलेली असताना नंतर इतर सुट्ट्या संपवणे योग्य ठरणार नाही. त्या सुट्ट्या काम सुरु केल्यावर आवश्यकतेनुसार घेता येऊ शकतात. त्यामुळे गरजेला सुट्टी मिळेल आणि तुम्हाला बाळासोबत वेळ घालवता येईल.

फॅमिलीसोबत प्लॅन

कामावर जाणाऱ्या महिलांना दिवसभर घरी काय करणार याची काळजी वाटते. पण हा काळ तुम्हाला कुटुंबासोबत, तुमच्या बाळासोबत कनेक्ट होण्यासाठी मिळालेला असतो. त्यामुळे फॅमिलीसोबतचे प्लॅन तुम्ही करू शकतात. शिवाय बाळाला सांभाळणारी, मालिश करण्यासाठी बाई, इत्यादी कामे तुम्हाला करता येतील.

सहकाऱ्यांना कामाची माहिती

तुम्ही सुट्टीवर गेल्यावर तुमचे काम कोण सांभाळणार हे विचारून घेत त्यांना आधीपासूनच कामाविषयी हळूहळू कल्पना देण्यास सुरूवात करा. जेणेकरून तुम्ही सुट्टीवर असताना कोणीही डिस्टर्ब करू नये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com