आरोग्याचे ‘बाळ’कडू : गोवर आणि लहान मुले

बांगलादेशातील गोवरच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर सीमावर्ती भागांना जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; लहान मुलांमध्ये ताप, पुरळ, डोळे-नाकाचे त्रास आणि गंभीर गुंतागुंती टाळण्यासाठी वेळेवर निदान व उपचारांची गरज
Measles is a highly contagious viral disease that can be prevented with timely MMR vaccination.

Measles is a highly contagious viral disease that can be prevented with timely MMR vaccination.

Sakal

Updated on

डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ

बांगलादेशात गोवर या आजाराचा गंभीर उद्रेक झाला आहे. या साथीच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने भारतात, विशेषत: भारत-बांग्लादेश सीमावर्ती भागात विशेष खबरदारीचा इशारा दिला आहे.

गोवर हा अतिशय संसर्गजन्य आजार असून तो हवेमार्फत (खोकताना किंवा शिंकताना) वेगाने पसरतो. लहान मुलांत ताप आणि अंगावर पुरळ येण्याची कारणे अनेक आहेत. अशा वेळी ‘माझ्या मुलाला नेमका गोवर झाला आहे की नाही?’ असा प्रश्न पालकांना पडतो. बहुतेकदा व्हायरल इन्फेक्शनमध्ये अंगावर पुरळ आली, की ताप उतरतो; पण गोवरामध्ये पुरळ आली, की तापाची तीव्रता वाढत जाते. सोबत डोळ्यांतून पाणी येणे, नाक वाहणे, त्रासदायक खोकला अशी लक्षणे आढळतात. तापाच्या तिसऱ्या दिवशी चेहऱ्यावर पुरळ येते. नंतर ते अंगावर व पायांवर फैलावते. पुरळ सर्व अंगावर येते, त्या क्षणी ताप उतरतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com