विद्यार्थ्यांसाठी ध्यान

आपली मुलं शहाणी, सर्वार्थाने हुशार व्हावीत अशी सगळ्याच आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न आणि धडपडही सुरू असते.
Student Yoga
Student Yogasakal

- मनोज पटवर्धन, योगतज्ज्ञ

आपली मुलं शहाणी, सर्वार्थाने हुशार व्हावीत अशी सगळ्याच आई-वडिलांची मनापासून इच्छा असते. त्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न आणि धडपडही सुरू असते. विद्यार्थीदशा मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे.त्यासाठी मोठमोठ्या फी भरून क्लासेस लावले जातात. क्रिकेट, टेनिसचं महागडं कोचिंग सुरू होतं. हे सगळे मार्ग उत्तम आहेतच. मात्र, या गडबडीत, आपल्या भारतीय प्राचीन परंपरेने सांगितलेला योग, ध्यानाचा पर्याय दुर्लक्षित होतो.

ध्यानामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ होते, हे अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये झालेल्या निरीक्षणातून समोर आलं आहे. ‘योगिक ध्यानामुळे मुलांच्या बुद्धिमत्तेची प्रत सुधारते का?’ यासंबंधी काही वर्षांपूर्वी नेदरलँडमधे एक वर्षभर प्रयोग केला गेला. वर्षभरानंतर ‘ध्यान करणारा गट आणि न करणारा गट’ यांची बुद्धीमापन चाचणी घेण्यात आली. त्यात नित्यनेमाने ध्यान करणाऱ्या मुलांच्या बुद्धिमत्तेत लक्षणीय वाढ दिसली.

सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेत वाढ १० टक्के इतकी होती, तर योगिक ध्यान करणाऱ्या विद्यार्थ्यांत वाढीचं प्रमाण २८ टक्के इतकं जास्त होतं. अमेरिकेतल्या अनेक विद्यापीठांतही असेच प्रयोग करण्यात आले. सखोल संशोधनानंतर ‘ध्यानानंतर विद्यार्थ्यांची सर्वसाधारण श्रेणी पुष्कळच सुधारली आहे’ असं निरीक्षण प्रयोगातून नोंदवलं गेलं.

सत्र सुरू होण्यापूर्वी या निवडक विद्यार्थ्यांची श्रेणी, प्रत यांची कसून परीक्षा घेण्यात आली. त्याबरोबर त्यांचा अभ्यासाच्या बाबतीतला पूर्वेतिहासही तपासला गेला. अमेरिकेतील विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा ‘श्रेणी बिंदू’ हा ध्यानाला सुरवात करण्यापूर्वी ‘उणे २’ होता. वर्षभराच्या योगिक ध्यानसाधनेनंतर तो ‘अधिक ३०४’ इतका झाला. याच विद्यार्थ्यांपैकी काहीजण पुढच्या आयुष्यात योगशिक्षकही झाले.

या संशोधनाचा अभ्यास असेही दर्शवतो, की ध्यानार्थी विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढते. त्यांचा अभ्यास इतर विद्यार्थ्यांपेक्षा फार जलद गतीने होतो. त्याचप्रमाणे अवघड, महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्यात त्यांची गती जास्त असते.यावरून असा निष्कर्ष निघतो की, ध्यानामुळे त्यांची स्मरणशक्ती तर सुधारतेच. त्याच्या जोडीला शैक्षणिक सामर्थ्यही वाढीला लागतं.

शाळा, महाविद्यालयांनी खालील सोपे ध्यान प्रकार करून घ्यावेत -

  • ओमकार म्हणणे, भ्रामरी करणे

  • डोळे मिटून काही मिनिटं शांत बसणे

  • एखाद्या देवतेच्या मूर्तीसमोर बसून श्लोक किंवा स्तोत्र म्हणणे

  • डोंगर, शांत तळं अशा ठिकाणी मुलांना नेऊन निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवणे

अशा साध्या ध्यान पद्धतींमुळे विद्यार्थ्यांचं मन शांत व्हायला नक्कीच मदत होते. एकाग्रता सुधारते, तणावाचा सामना करण्यासाठी सामर्थ्य मिळतं. नियमित ध्यानाची सवय झाली, की मनावर नियंत्रण मिळवणं सोपं होतं.विवेकानंदांना अपेक्षित तेजस्वी, प्रतिभावान तरुण अशा ध्यानसाधक विद्यार्थ्यांमधून घडतील. हेच भारताची ‘सर्वांगीण विकसित राष्ट्र’ अशी ओळख करून देतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com