Meditation Tips : मानसिक शांतीसाठी मेडिटेशन सुरू करायचंय? या टिप्स फॉलो करा

हल्लीच्या जगात सगळं विकत मिळतं, मानसिक शांतता सोडून.
Meditation Tips
Meditation Tipsesakal

How To Meditate 10 Easy Steps : हल्लीच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच वेळेची कमी आहे. अनेक गोष्टी मिळवायच्या असतात, अनेक स्पर्धा जिंकायच्या असतात. सतत स्वतःला सिद्ध करायचं असतं. या सगळ्यात माणूस फार ताणात वावरत असतो. यामुळे माणसाला बाजारातून सगळं काही विकत घेता येऊ शकते, फक्त मानसिक शांती मात्र मिळत नाही.

माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ, यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले त्याने मनाने खंबीर आणि स्थिर असणं आवश्यक असतं. ती स्थिरता त्याला मानसिक शांतताच देऊ शकते. यासाठी मेडिटेशन हे अत्यंत महत्वाचे आहे.

Meditation Tips
Meditation Tipsesakal

आपण रोजच्या धकाधकाच्या जीवनात अनेक गोष्टी करत असतो, बघत असतो. शिवाय अनेक गोष्टी करण्याचे नियोजन असते. त्यामुळे मनात सतत अनेक विचार घोळत असतात. मग ध्यान लागत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तर काही लोकांना ध्यान करायचे तर असते पण ते कसे करावे हेच माहिती नसते. अशा सगळ्यांसाठी या १० सोप्या टिप्स देत आहोत.

Meditation Tips
Meditation Tipsesakal

कसे करावे मेडिटेशन?

मेडिटेशन हे मनाला शिस्त लावण्याचे एक माध्यम आहे. जे मन सतत सैरभैर फिरत असते त्याला एका ठिकाणी गुंतवून ठेवणे शक्य नसते. त्याला हळू हळू सवय लावावी लागते.

त्यामुळे मेडिटेशन करताना कोणतीही घाईगडबड, ओढाताण करू नये. धीर ठेवत सावकाश करायची ही प्रक्रिया आहे.

ध्यान करणे म्हणजे मनाला शांत करण्याचा प्रयत्न असतो. पहिल्यांदा हा प्रयत्न म्हणजे ध्यान ५ ते १० मिनीटंच करावा.

Meditation Tips
Meditation Tipsesakal

ध्यान करताना मनात इतर विचारांना थारा देऊ नका. मनाला इकडे तिकडे भटकू देऊ नका.

श्वासावर लक्ष द्या. दिवसभरात आपण जो श्वास घेतो तो फार वेगात आणि अपूर्ण असतो. ध्यान करताना श्वासाची संथ असावी. हळूवार दीर्घ श्वास घ्या आणि हळूवार सोडा.

जेव्हाही मनात कोणता विचार येईल तेव्हा तो बाजूला सारत लक्ष परत श्वासावर केंद्रित करा.

Meditation Tips
Meditation Tipsesakal

ध्यानाची सवय होईपर्यंत ध्यानाची जागा, वेळ नियमित पाळली जाणे आवश्यक असते. मनाला एकाग्रतेची सवय लागायला वेळ लागतो. पण ते परत भटकायला फार वेळ लागत नाही.

ध्यान रोज नियमित करणे आवश्यक आहे. यातून रोज तुम्हाला एनर्जी मिळेल. मन ताजे तवाने होईल.

ध्यानाने मन शांत होते. त्यामुळे झोपसुद्धा चांगली लागते.

ध्यानामुळे अनेक आजारांबरोबरच हृदय विकारातही आराम मिळतो.

शिवाय व्यसनाधिन व्यक्तींना व्यसन मुक्त होण्यापासूनही सुटका मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com