Contraceptive Pills For Men : काय सांगताय? आता पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळी? फक्त अर्ध्या तासात...

पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया
Contraceptive Pills For Men
Contraceptive Pills For Menesakal

Contraceptive Pills For Men : नको असलेली प्रेग्नेंसी टाळण्यासाठी हल्ली वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब केला जातो. कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या हल्ली कॉमन झाल्या आहेत. हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण आता पुरुषांसाठीसुद्धा गर्भनिरोधक गोळ्या आल्यात. महिलांच्या कंडोमचीसुद्धा हल्ली जोरदार चर्चा सुरू आहे. पुरुषांच्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.

आतापर्यंत तुम्ही महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्यांविषयी ऐकलं असेल मात्र आता पुरुषांसाठीसुद्धा गर्भनिरोधक गोळ्या विकसित केल्या गेल्या आहेत. स्पर्मचा वेग कमी करणारी ही गोळी Pre Clinical Models मधून आता पुढल्या टप्प्यात पोहोचली आहे.

तुम्हाला वाचताना फार आश्चर्य वाटत असलं तरी ही बाब खरी आहे. पुरुषांसाठीची गर्भनिरोधक गोळी वापरासाठी उपलब्ध झाल्यास ही मोठी क्रांतीच ठरेल. याविषयीचा संपूर्ण अहवाल जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध करण्यात आला.

रिसर्चरच्या मते हे संशोधन Game Changer असेल. सध्याच्या घडीला पुरुष कंडोम आणि नसबंदी याच उपायांचा वापर करतात. पण, ही गोळी यात बरेच बदल करेल. दरम्यान यावरील संशोधन अद्यापही पूर्ण झालेलं नाही. (Pregnancy) यापुढे ही गोळी मानवी चाचण्यांपर्यंत पोहोचल्यास यापुढे ती वापरातही आल्यास आश्चर्य वाटायला नको.

Contraceptive Pills For Men
Pregnancy Health Care : तिसरा महिना संपताच ही लस घ्यायला विसरु नका, गर्भाच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक

ही गोळी कशी काम करेल?

संशोधन सुरु असताना सर्वप्रथम या गोळीची चाचणी उंदरांवर करण्यात आली. उंदरांवर याचे कोणतेही दुष्परिणाम झाले नाहीत. मात्र या गोळीमध्ये शुक्राणू निष्क्रीय करण्याची क्षमता असल्याचं स्पष्ट झालं. (Men) पुढल्या 24 तासांत स्पर्मची हालचाल अगदी पूर्ववत झाल्याचे दिसून आले.

संबंधित गोळीवर अभ्यास करणाऱ्या संशोधकांसोबत काम केलेल्या डॉ. मेलानी बालबॅच यांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोळी घेतल्यानंतर ती साधारण अर्ध्या ते एक तासानंतर शरीरावर प्रभाव पाडण्यास सुरुवात करते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com