Periods Problem : फक्त अति रक्तस्रावच नाही तर कमी रक्तस्रावही असतो तितकाच घातक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Periods Problem

Periods Problem : फक्त अति रक्तस्रावच नाही तर कमी रक्तस्रावही असतो तितकाच घातक

मुंबई : मासिक पाळी नियमितपणे येणे खूप महत्त्वाचे आहे. अति रक्तस्राव धोकादायक मानला जातो. मात्र बऱ्याचशा स्त्रिया कमी रक्तस्रावाला फारसे गांभीर्याने घेत नाहीत.

होमिओपॅथिक डॉक्टर स्मिता भोईर पाटील यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मासिक पाळी न येण्याची कारणे स्पष्ट केली आहेत.

त्या म्हणतात, हलका रक्तस्राव कदाचित सोयीचा वाटेल परंतु दीर्घकाळ ही स्थिती राहिल्याने तुमच्या प्रजनन प्रणालीवर परिणाम होतो.

रजोनिवृत्तीपूर्व ताणतणाव, अचानक वजन वाढणे यासह अनेक गंभीर आरोग्य परिस्थितींचा परिणाम असू शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.

हेही वाचा - जगायचं कसं हे सांगण्यासाठी हवं 'लिव्हिंग विल'

हेही वाचा: Sushant Singh Rajput : सुशांतचा जीव जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला हा आजार आहे भयंकर

कमी रक्तस्रावाची कारणे

  • पॅड किंवा टॅम्पॉन्स बदलण्याची फारशी गरज नसणे.

  • कालावधी ५ दिवसांपेक्षा कमी

  • खूप हलका रक्तस्राव

  • मासिक पाळी दरम्यान प्रवाहाऐवजी हलके स्पॉटिंग

  • कमी इस्ट्रोजेन पातळी

ज्या महिलांमध्ये एस्ट्रोजेनची पातळी कमी असते त्यांना मासिक पाळी दरम्यान हलका रक्तस्राव होऊ शकतो. कारण इस्ट्रोजेन गर्भाशयाच्या अस्तराची जाडी वाढवते.

इस्ट्रोजेन कमी होणे हे खूप जास्त व्यायाम, खराब आहार किंवा ओव्हुलेशनमध्ये अडथळे यांमुळे देखील होऊ शकते.

रक्तातील प्रोलॅक्टिनची उच्च पातळी

प्रोलॅक्टिन हा एक प्रकारचा संप्रेरक आहे, जो स्त्रियांमध्ये स्तन वाढ आणि दूध उत्पादनाशी संबंधित आहे. रक्तातील त्याचे प्रमाण वाढल्यामुळे पाळीमध्ये अडथळे येऊ शकतात. यासोबतच उच्च प्रोलॅक्टिन महिलांमध्ये प्रजनन क्षमता कमी करण्याचे काम करते.

हेही वाचा: Ashok Saraf आणि Urfiला झालेला लॅरिन्जायटिस आजार तुम्हाला झाल्यास काय कराल ?

थायरॉइड

खूप जास्त किंवा खूप कमी थायरॉइड संप्रेरकामुळे पाळीमध्ये कमी किंवा जास्त किंवा अनियमित रक्तस्राव होऊ शकतो.

थायरॉईड रोगामुळे तुमची मासिक पाळी काही महिने किंवा त्याहून अधिक काळ थांबू शकते, ज्याला अमेनोरिया म्हणतात.

ओव्हुलेशन कमी होणे

अंडी उत्पादनाशिवाय स्त्रियांमध्ये मासिक पाळी येणे शक्य नाही. जेव्हा शरीर ते पुरेसे बनवत नाही, तेव्हा मासिक पाळी हलकी किंवा अनियमित होते.

अशक्तपणा

रक्त कमी होणे किंवा अशक्तपणा आणि मासिक पाळी एकमेकांशी संबंधित आहेत. अति रक्तस्रावामुळे रक्त कमी होते, तर अशक्तपणामुळे कमी रक्तस्राव होऊ शकतो.

सूचना : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

टॅग्स :periodMenstruation