Mental Stress and Cancer : मानसिक तणाव ठरतंय कॅन्सरचं कारण? तरुण-तरुणींनी खबरदारी घेण्याचं तज्ज्ञांचं आवाहन

Mental Stress : समाज पुढे जात असताना आणि लोकांवर दबाव वाढत असताना, ताण हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.
Cancer and Mental Stress
Cancer and Mental StresseSakal

Mental Stress might be reason behind Cancer : गेल्या काही वर्षांत, विविध प्रकारच्या कर्करोगाच्या प्रादुर्भावात लक्षणीय वाढ झाली आहे. एपिडेमियोलॉजिकल स्टडीज आणि ग्लोबीकॉनच्या डेटामध्ये दिलेल्या माहितीनुसार; जगभरात कर्करोगाच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे. येत्या काही दशकांत या संख्येत सहापट वाढ होण्याचा अंदाज आहे. भारतासारख्या विकसनशील देशांना हा धोका अधिक आहे.

कर्करोगाच्या अनेक कारणांपैकी सर्वात दुर्लक्षित केलेलं कारण म्हणजे मानसिक तणाव. समाज पुढे जात असताना आणि लोकांवर दबाव वाढत असताना, ताण (Stress) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. कामाचा ताण, सहकाऱ्यांच्या अपेक्षा आणि टार्गेट पूर्ण करण्यासाठीचा ताण यांसारख्या कारणांमुळे तो निर्माण होतो.

या ताणामुळे शरीरामध्ये हॉर्मोनल असंतुलन (Hormonal imbalance) निर्माण होतं. पर्यायाने लोक जलदगतीने काम करणारे स्ट्रेस-बस्टर्स शोधू लागतात. यामध्ये मग फास्ट फूड, जंक फूड, मद्यपान, धूम्रपान किंवा तंबाखू सेवन अशा प्रकारच्या गोष्टींचं सेवन करण्याचा पर्याय लोक अवलंबतात. या सर्व पदार्थांच्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. कर्करोगासाठी या पदार्थांना ब्लेम करताना, तणावाकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष केलं जातं.

Cancer and Mental Stress
Insomnia due to Phone Use: शंभरात सहा जणांना रात्री येतच नाही झोप, मोबाइलवरील 'या' गोष्टींंमुळे मानसिक आजारही बळावले

कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका कमी करण्यासाठी मानसिक आरोग्यावर (Mental Health) अधिक भर देणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य हे संपूर्ण आरोग्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि ताण पातळी कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ताणपूर्ण मनस्थिती उपचारांवरही नकारात्मक परिणाम करू शकते. म्हणूनच, साईक-ऑनकॉलॉजिस्ट तज्ज्ञ किंवा आरोग्य सेवा व्यावसायिकांकडून मदत घेणे आवश्यक आहे.

कर्करोग रुग्णालयांमध्ये (Cancer Hospitals) अनेकदा डेडिकेडेट साईक-ओन्कोलॉजी विभाग असतात जे रुग्णांना उपचारांमधून मार्गदर्शन करण्यासाठी, उपचाराचे फायदे समजून घेण्यासाठी आणि शक्य असलेल्या दुष्परिणामांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी मदत करतात. सर्वोत्तम परिणाम सुनिश्चित करण्यासाठी कर्करोगाच्या प्रवासात सर्वोच्च प्राधान्य मानसिक आरोग्याला देणे आवश्यक आहे.

- प्रा. डॉ. राज नगरकर, व्यवस्थापकीय संचालक आणि सर्जिकल ऑन्कोलॉजी आणि रोबोटिक सर्व्हिसेस प्रमुख, [HCG मानवता कॅन्सर सेंटर (HCGMCC) अँड हॉस्पिटल्स]

Cancer and Mental Stress
Cosmetic Surgery : सर्वसामान्यांमध्ये का वाढतेय प्लॅस्टिक सर्जरीची क्रेझ? मोबाईलशी आहे थेट कनेक्शन, वाचा रिपोर्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com