
Monsoon Diseases Surge in Maharashtra; Mumbai Records Highest Cases
sakal
Mumbai Leads in Monsoon Disease Cases Amid Statewide Health Crisis: राज्यात पावसाळी आजारांचा कहर सुरू असून, आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार या वर्षी राज्यात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मलेरियाचे १५ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. मलेरियाने तब्बल १२ जणांचा जीव घेतला आहे. दुसरीकडे डेंग्यू, स्वाइन फ्ल्यू, लेप्टो आणि इतर आजार एकत्रितपणे दुहेरी हल्ला करीत आहेत. सध्या मुंबईत पावसाळी आजारांच्या सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.