Health Checkup After Age Of 40 : चाळीशीत आवर्जून करा हे 5 हेल्थ चेकअप, डॉक्टर्स देतात खास सल्ला

तेव्हा वयाच्या चाळीशीत काही चाचण्या केल्यास तुमचा अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो
Health Checkup After Age Of 40
Health Checkup After Age Of 40 esakal

Health Checkup After Age Of 40 : सुखी जीवनासाठी आरोग्य निरोगी असायला हवं. निरोगी लाइफस्टाइलसाठी तज्ज्ञ कायम आपल्याला वेगवेगळे सल्ले देत असतात. काही आजार सुरुवातीच्या दिवसांत कळले नाहीत तर ते गंभीर रूप धारण करतात. तेव्हा वयाच्या चाळीशीत काही चाचण्या केल्यास तुमचा अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो. चला तर अशा कोणत्या चाचण्या आहेत ज्या वयाच्या चाळीशीत आवर्जून कराव्यात ते जाणून घेऊयात.

वयाच्या चाळीशीत कराव्यात या चाचण्या

१. कँसर

२. आयर्न ब्लड टेस्ट

३. कोलेस्ट्रॉल

४. न्यूट्रिशन ब्लड टेस्टिंग

५. ब्लड प्रेशर

डॉ. जटला यांच्या मते, त्वचेचा कँसर हा सगळ्यात सामान्य कँसर आहे. ज्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. तेव्हा तुमच्या त्वचेच्या बदलत्या रंगाकडे किंवा आकाराकडेसुद्धा विशेष लक्ष द्या.

डॉ. जटला यांनी तरूणांना आयर्न ब्लड टेस्टिंगचा सल्ला दिला आहे ज्यामुळे आयर्नच्या कमतरतेमुळे होणाऱ्या अॅनिमियाचा शोध लावल्या जाऊ शकतो. अॅनिमियामुळे श्वास घेण्यास त्रास, पिवळी त्वचा, जटिलता तयार होते. तुम्ही आयर्नयुक्त गोष्टी खात नसाल तर तुम्ही अॅनिमिया होऊ शकतो.

Health Checkup After Age Of 40
Health Care News: फिटनेस रुटीनमध्ये क्रंचेसचा करा समावेश, शरीरात दिसून येतील हे बदल

अधिक फॅटयुक्त आहार किंवा धुम्रपान केल्यास हाय कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार पाचपैकी दोन लोकांमध्ये हाय कोलेस्ट्रॉलची समस्या असते. ज्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. ज्या लोकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी मद्यपान कमी करावे. अशांनी आठवड्यातून कमीत कमी १५० मिनिट एक्सरसाइज नक्की करावी.

Health Checkup After Age Of 40
Health Tips पपई खाण्याचे Side Effects तुम्हाला ठाऊक आहेत का? आरोग्यासाठी हानिकारकही ठरू शकतं पपईचं सेवन

डॉक्टरांच्या मते ब्लड न्यूट्रिशन टेस्ट यासाठी करावी कारण त्यातून तुमच्या शरीरात कोणत्या व्हिटॅमिन्सची कमतरता आहे ते कळेल. व्हेजिटेरियन लोकांमध्ये व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता जास्त असते.

ब्लड प्रेशर हल्ली अनेक लोकांमध्ये सामान्य समस्या झालीय. म्हणून त्याचीसुद्धा चाचणी आवर्जून करावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com