Mobile Addiction in Kids : मोबाईल, संगणकाच्या अतिवापरामुळे नऊपैकी दोघांना चष्मा

Mobile Addiction in Kids : सध्याच्या काळात मोबाईल लोकांच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. लहान मुलांच्या अभ्यासापासून अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत.
Mobile Addiction in Kids
Mobile Addiction in Kids esakal

Mobile Addiction in Kids : सध्याच्या काळात मोबाईल लोकांच्या जीवनाचा खूप महत्त्वाचा भाग झाला आहे. लहान मुलांच्या अभ्यासापासून अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल लागतोच. लोक आता प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईल वापरत आहेत. मात्र, मोबाईलचा हाच अतिवापर धोकादायक ठरू शकतो. मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होतात. (nashik Two out of nine suffer from glasses due to excessive use of mobiles and computers marathi news)

दिवसेंदिवस मोबाईल, टीव्ही, संगणकाचा अतिवापर वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये डोळ्यांच्या विकारांत वाढ होत असून, अनेक पालक स्वतःची कामे आटोपण्यासाठी लहान मुलांना तासन्‌तास मोबाईल, टीव्ही आणि संगणकासमोर गेम लावून मुभा देतात. स्क्रीनचा प्रकाश डोळ्यांसाठी घातक असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यावर उपाय म्हणजे पालकांनीच मुलांना मोबाईल, संगणक, टीव्हीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. मोबाईलवर तासन्‌तास गेम खेळणे, इतर गोष्टी पाहण्याचा अतिरेकी वापर चक्क डोळ्यांवर परिणाम करू लागला आहे. रात्री मोबाईलचा उजेड थेट डोळ्यांवर पडतो. आणि डोळ्यांवर ताण वाढतो. वारंवार मोबाईलचा अतिवापर केल्याने मोठा क्रमांकाचा चष्मा वापरावा लागतो.

जीवनसत्त्वाचा अभाव

लहान मुलांचा चटपटीत खाण्याकडे कल आहे. मोबाईल, संगणक, टीव्हीप्रमाणे प्रोटिनयुक्त आहाराचा अभावही कारणीभूत आहे. मुलांना कडधान्ये पालेभाज्यांचा समावेश असलेला जीवनसत्त्वयुक्त आहार देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे नेत्रतज्ज्ञांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

Mobile Addiction in Kids
Mobile Phone Addiction: तुमचं मूल ३ तासांपेक्षा जास्त वेळ Mobile वापरतंय तर वेळीच व्हा सावध...अन्यथा जडतील हे आजार

अशी घ्या काळजी

दिवसभरात केवळ एक तास टीव्ही पाहणे. टीव्ही दहा ते पंधरा फुटांवरून पाहावा. मुलांना संगणक, मोबाईलपासून दूर ठेवा. आहारात सकस पदार्थांचा समावेश असावा. डोळ्यांच्या तक्रारी जाणवल्यास नेत्रतज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधावा.

''पालकच मुलांना टीव्ही, संगणक, मोबाईलवर गेम खेळायला देतात. तासन्‌तास मोबाईल बघत बसतात. डोळ्याच्या विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन मुले येत आहेत. पाचपैकी एक मुलांमध्ये दृष्टिदोष आढळून येत आहे. त्यांना चष्म्याशिवाय पर्याय नसतो. डोळ्याच्या तक्रारी असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. घरगुती उपचार पद्धती टाळावी.''-डॉ. माधवी साळुंके, नेत्ररोग तज्ज्ञ

Mobile Addiction in Kids
Mobile Addiction : धोक्याची घंटा! स्मार्टफोनच्या व्यसनात भारतीय अव्वल; जगातील इतर लोकांपेक्षा जास्त होतोय दैनंदिन वापर..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com