मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन

मोबाईल फोन वापरत नसलेल्या लोकांच्या तुलनेत जे लोक मोबाईल फोन वापरतात त्यांना ब्रेन ट्यूमरचा धोका नसतो.
मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन

No link between cell phone use and brain Tumors : आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये मोबाईल फोन आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. आज कदाचित अशी कोणीही व्यक्ती नसेल जी नेहमी आपला मोबाईल आपल्यासोबत ठेवत नाही. पण वेळोवेळी जगातील वैज्ञानिक मोबाईल फोन पेक्षा जास्त वापर करण्याबाबत ताकीद देत असतात. याचे रेडिएशनचा (Radiation) थेट मेंदूवर परिणाम होतो. पण एका नव्या संशोधनातून समोर आले आहे की, मोबाईलच्या जास्त वापरामुळे ब्रेन ट्युमर होण्याचा धोका नाही.

मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन
लघवी करताना चूकनही करू नका 'या' चूका; महिलांनी घ्यावी विशेष काळजी

वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशनच्या (WHO) अंतर्गत काम करणारी एजन्सी आायसीआरए (IARC) म्हणजे इंटरनेशनल एजेंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर (International Agency for Research on Cancer) आणि ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीच्या (University Of Oxford) नव्या अभ्यासामध्ये सुरू असलेल्या एका प्रोजेक्टबाबत सांगितले की, मागील 20 पेक्षा जास्त वर्षांपासून UK मध्ये साधरण १० लाख महिलाच्या आरोग्यावर लक्ष्य ठेवले होते.

या अभ्यासाच्या निष्कर्षनुसार ब्रेन ट्युमरचा वाढता धोका आणि मोबाईल फोन वापरल्यामध्ये कोणताही संबध नाही. रिसचर्सने सांगितल्यानुसार, अभ्यासामध्ये ७ लाख ७६ हजार जास्त महिलांना समाविष्ठ केले. सर्व सहभागी महिलांना दोन दशक(२० वर्ष) रोज मोबाईलचा वापर केला.

मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन
भारतात होणारे 67 टक्के गर्भपात असुरक्षित, दररोज 8 महिलांचा होतो मृत्यू

अभ्यासात काय निष्पन्न झाले?

जे लोक मोबाईल फोन वापरत नाहीत, त्यांच्या तुलनेत मोबाईल वापरणाऱ्यामध्ये ब्रेन ट्यूमरचा कोणताही धोका नाही. संशोधकांनी असा निष्कर्ष मांडला की, मोबाईल फोनच्या वापर करणारे आणि न करणाऱ्यांमध्ये ब्रेन ट्युमर होण्याच्या धोक्यामध्ये महत्त्त्वपूर्ण फरक नव्हता, त्याशिवाय ज्या लोकांना १० वर्षांपेक्षा जास्त काळा रोज मोबाईल वापरला आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा ट्युमर झालेला नाही.

तज्ज्ञ काय सांगतात

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील वैद्यकीय भौतिकशास्त्र आणि क्लिनिकल अभियांत्रिकीचे संचालक प्रोफेसर माल्कम स्पिरिन म्हणाले की, ''मोबाइल फोनमुळे उद्भवणारे धोके लक्षात घेता या अभ्यासाचे स्वागत आहे. त्यामुळे मोबाईलबद्दल लोकांमध्ये असलेला सध्याचा गैरसमज दूर होऊ शकतो.'' ते म्हणाले की,'' त्यांची टीम साइड इफेक्ट्सबाबत अधिक अभ्यास करेल.''

मोबाईल फोनचा वापर आणि ब्रेन ट्युमरमध्ये कोणताही संबध नाही; ऑक्सफोर्डचे संशोधन
नवरा कॅन्सरनं गेला; दोन वर्षांनी आता पत्नी देणार त्याच्या बाळाला जन्म

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com