नवरा कॅन्सरनं गेला; दोन वर्षांनी आता पत्नी देणार त्याच्या बाळाला जन्म

Widow Woman Becomes Pregnant after 9 Months of Husband’s Death with IVF
Widow Woman Becomes Pregnant after 9 Months of Husband’s Death with IVF
Summary

पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय महिला गर्भवती राहिली

IVF तंत्राच्या मदतीने झाली गर्भवती

लॉरेन मॅकग्रेगर ही सिंगल मॉम आहे. काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीचा ब्रेन ट्युमरने मृत्यू झाला होता. लॉरेनची इच्छा होती की.''तिचा नवरा, मृत्यूपूर्वी आपल्या बाळाला पाहू शकेल.''

33 वर्षाच्या लॉरेनने एका पॉडकास्टच्या माध्यमातून सांगितले की, ''तिच्या हसण्या-खेळत्या जीवनात ब्रेन ट्यूमर खूप लवकर आला. दोघेही अनेक दिवसांपासून आपले कुटुंब वाढवण्याचे स्वप्न पाहत होते. पण पतीच्या उपस्थितीमध्ये गरोदर राहण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले.''

Widow Woman Becomes Pregnant after 9 Months of Husband’s Death with IVF
Happiest Zone ठरलेल्या फिनलॅन्डमध्ये लोक इतके खूश कसे?

2019 च्या अखेरीस, लॉरेन गर्भधारणेबद्दल गंभीर झाली होती. पण तोपर्यंत क्रिसचाआजार बळावला होता. त्या दोघांनी केमोथेरपीपूर्वी ख्रिसचे शुक्राणू गोठवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोना महामारीने जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याचा त्यांच्या वैद्यकीय सेवेवरही वाईट परिणाम झाला.

शेवटी, 2020 मध्ये क्रिससच्या मृत्यूनंतर नऊ महिन्यांनी, लॉरेनने तिच्या गर्भाशयात इन विट्रो फर्टिलायझेशन (In vitro fertilization-IVF) सह शुक्राणूंची गर्भधारणा केली. लॉरेनला नाईलाजाने हे काम एकटीला करावे लागले. परंतु कित्येक गोष्टींमध्ये तिला ''असे वाटते क्रिस तिच्यासोबत आहे.''

मॅकग्रेगरने पॉडकास्टवर सांगितले की, क्रिस आणि ती लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते. क्रिसच्या आईच्या मृत्यूनंतर 2012 मध्ये दोघे पुन्हा जवळ आले.

Widow Woman Becomes Pregnant after 9 Months of Husband’s Death with IVF
Google Earthने शोधल्या गार्डनमध्ये लपवलेल्या चोरीच्या 500 सायकली!

क्रिसलाही पूर्वीच्या नात्यातून मुलगा झाला होता. तरीही त्या दोघांची इच्छा होती की, एक दिवस त्यांनाही मूल व्हावे. पण, जेव्हा क्रिसला 2013 मध्ये ब्रेन ट्यूमर असल्याचे निदान झाले तेव्हा त्याने परस्पर संमतीने ही योजना पुढे नेली. 2017 मध्ये मुले जन्माला घालण्याची इच्छा पुन्हा तीव्र झाली जेव्हा क्रिसने केमोथेरपी सुरू केली आणि त्यांना शुक्राणू गोठवण्याचा पर्याय मिळाला.

केमोथेरपीमुळे पुरुषांची प्रजनन क्षमता खराब होऊ शकते. पण उपचारानंतर क्रिसचे शुक्राणू चार पटीने मजबूत झाले. तिला काही महिन्यांत शुक्राणू गोठवण्याची बँक(IVF Bank) मिळाल्याने तिला आनंद झाला. मॅकग्रेगर म्हणाले, "आम्हाला या गोष्टीची गरज भासेल असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. पण आमच्याकडे बँक आहे याचा मला आनंद आहे. म्हणूनच आज त्यामुळेच मी गरोदर राहू शकले.'

क्रिसशिवाय मूल वाढवण्याच्या शक्यतेवर या जोडप्याने आधीच चर्चा केली होती. दोघांनी मिळून बाळाच्या नावाचाही विचार केला. मॅकग्रेगरने बाळाला तेच नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

Widow Woman Becomes Pregnant after 9 Months of Husband’s Death with IVF
ट्रेनची वाट पाहणे होणार मजेशीर, रेल्वे स्टेशनवर आता Gaming Zone

कशी गर्भवती झाली महिला?

मॅकग्रेगर यांनी सांगितले की, तिच्या पतीच्या मृत्यूनंतर IVF सुरू करण्यासाठी क्लिनिकला नऊ महिने प्रतीक्षा करावी लागली. पहिल्या सायकलनंतर मी गर्भवती झाले. मॅकग्रेगरने क्रिसच्या मुलाला याबद्दल माहिती देण्यासाठी 12 आठवडे वाट पाहिली. क्रिसच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू तरळले जेव्हा त्याला या गर्भधारणेबद्दल कळले. वडिलांचे आठवण म्हणून हे स्वीकारल्याबद्दल त्याने मॅकग्रेगरचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com