लघवी करताना चूकनही करू नका 'या' चूका; महिलांनी घ्यावी विशेष काळजी

The peeing mistakes you’re probably making as a woman
The peeing mistakes you’re probably making as a woman
Summary

लघवी करताना काही चूकांमुळे इन्फेक्शन खूप जास्त वाढू शकते.

महिलांना विशेषत: या समस्येचा जास्त सामना करावा लागतो.

तुम्हाला माहितीये का तुम्हाला लघवी करताना काही गोष्टींची काळजी न घेणे तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे तुम्हाला कित्येक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. महिलांना विशेषत: या समस्यांचा जास्त सामना करावा लागू शकतो. लघवी करताना काही चूकांमुळे इन्फेक्शन खूप जास्त वाढू शकते ज्या कित्येक वेळा तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

स्त्रीरोगतज्ज्ञ आणि यूरोलॉजिस्ट स्टॅलिओस डोमोचिसनुसार, महिला शरीरशास्त्रामुळे त्यांना कित्येक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्याबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की मूत्रमार्ग ( ज्याद्वारे नलिकेद्वारे लघवी बाहेर पडते) छोटा असतो ,ज्याद्वारे बॅक्टेरिया सह प्रवेश करू शकतात.

The peeing mistakes you’re probably making as a woman
रक्तातील प्लाझ्मा विकून महिन्याला Disney Worldची सैर करणारी महिला

बायो मेकेनिकल दृष्टीकोनातून पाहिले तर त्याचा महिलांच्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो. अशावेळी ज्या महिलांना यूरिन इन्फेक्शनची समस्या होते, त्यांना आणखी जास्त समस्यांची काळजी घ्यावी लागते. प्रो स्टर्गियोसने द सन सोबत संवाद साधताना सांगितले की, महिलांना आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये कित्येक प्रकारच्या शारिरीक बदलांचा सामना करावा लागू शकतो, जसे की मासिक पाळी, गर्भवस्था आणि मॅनोपॉज. हे सर्व गोष्टी यूरिनरी टॅक्टच्या कार्यावर परिणाम करू शकतात.

अशावेळी महिलांनी लघवी करताना आपल्या सवयी बदलणे आणि काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

मागून पुढचा भाग पुसणे - प्रोफेसर स्टर्गिओस म्हणाले की, प्रायव्हेट पार्ट साफ करताना मागून पुढच्या बाजूने कधीही पुसणार नाही याची विशेष काळजी घ्या. आपल्या गुद्द्वारात (Anal) बॅक्टेरिया खूप सामान्य असतात, मागून पुढचा भाग पुसून हे बॅक्टेरिया पुढे येतात जे तुमच्या मूत्रमार्गात सहज प्रवेश करू शकतात आणि यामुळे मूत्रमार्गाच्या संसर्गाचा धोका खूप वाढतो. युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमुळे महिलांना प्रायव्हेट पार्ट्समध्ये जळजळ आणि वेदना होतात.

The peeing mistakes you’re probably making as a woman
WhatsApp चे 'बोल बेहेन' चॅटबॉट, एका मेसेजवर देणार हेल्थ टिप्स

प्रायव्हेट पार्ट जास्त पुसणे- लघवी केल्यानंतर प्रायव्हेट पार्ट कोरडा ठेवण्यासाठी तो पुसणे आवश्यक आहे परंतु हे जास्त वेळा केल्याने तुम्हाला त्रास होऊ शकतो. असे केल्याने प्रायव्हेट पार्टच्या त्वचेला जळजळ आणि खाज येऊ शकते

लघवीसाठी वेळ निश्चित करणे - प्रो. स्टर्गिओस म्हणतात की, लघवी करण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करणे खूप धोकादायक असू शकते. हे मूत्राशय योग्यरित्या लघवी गोळा करण्यापासून प्रतिबंधित करते. मूत्राशय सहसा 450 ते 500 मिली लघवी साठवते. पण जर तुम्ही दर अर्ध्या तासाने लघवीला जात असाल तर मूत्राशयात खूप कमी प्रमाणात लघवी जमा होते ज्यामुळे मूत्राशय नीट काम करत नाही आणि तुम्हाला काही काळ लघवी झाल्यासारखे वाटते. रेल्वेच्या लांब प्रवासापूर्वी लघवी करणे किंवा चित्रपट पाहणे यात काही गैर नाही पण सवयीप्रमाणे ते नियमितपणे करणे चांगले नाही.

The peeing mistakes you’re probably making as a woman
हॅकर्सने Apple आणि Facebook बनवले होते Fool, अशी केली होती फसवणूक

लघवी आल्यानंतर तरी दाबून ठेवणे - मूत्राशय भरलेला नसला तरीही लघवी करणे ही एक वाईट सवय आहे, परंतु लघवीच्या आल्यानंतर ती दाबून ठेवणे आणखी वाईट आहे. यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात.

जास्त पाणी पिणे- दिवसभरात 2 ते 3 लिटर पाणी पिणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते, जर तुम्ही व्यायाम करत असाल किंवा उन्हाळा असेल तर तुम्ही खूप पाणी पिऊ शकता. परंतु असे बरेच लोक आहेत जे एका दिवसात 6 ते 7लीटर पाणी पितात जे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. तुम्ही जास्त पाणी पिऊन स्वतःला जास्त हायड्रेट करण्याचा प्रयत्न करता. द्रवपदार्थाच्या अतिसेवनामुळे मूत्राशय जास्त लघवी तयार करतो. त्यामुळे वारंवार शौचालयात जावे लागते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com